जागतिक अर्थव्यवस्थेबद्दल जपानला चिंता

वृत्तसंस्था
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

टोकयो: डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील विजय, युरोपियन महासंघातून ब्रिटनने बाहेर पडणे (ब्रेक्‍झिट), यामुळे जागतिक अर्थव्यवस्था कठीण परिस्थितीत असल्याचे सांगत जपान सरकारने जागतिक अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सध्याच्या कठीण काळातून अर्थव्यवस्था मार्ग काढत असल्याचे या वेळी सांगण्यात आले. 

जपानच्या मंत्रिमंडळाने जागतिक अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करणारा अहवाल सादर केला. यामध्ये "ब्रेक्‍झिट'मुळे झालेले नुकसान नमूद करत अमेरिकेच्या आर्थिक धोरणांबद्दल शंका व्यक्त करण्यात आली आहे. मागील आठवड्यात जपानचे पंतप्रधान शिंजो ऍबे हे न्यूयॉर्कला ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीला गेले होते. त्यामुळे हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला नाही. अमेरिकचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जपानसोबत असणारा ट्रान्स-पॅसिफिक भागिदारी करार संपुष्टात आणणार आहेत.  

Web Title: Japan report frets over global economy