यंत्रमानवांवर कर आकारा: बिल गेट्‌स

पीटीआय
रविवार, 19 फेब्रुवारी 2017

वॉशिंग्टन - "मानवांचा रोजगार चोरणाऱ्या रोबोट्‌सनी कर भरावा,' असे सूचक विधान मायक्रोसॉफ्ट सहसंस्थापक बिल गेट्‌स यांनी केले आहे.

वॉशिंग्टन - "मानवांचा रोजगार चोरणाऱ्या रोबोट्‌सनी कर भरावा,' असे सूचक विधान मायक्रोसॉफ्ट सहसंस्थापक बिल गेट्‌स यांनी केले आहे.

"ऑटोमेशनशी संबंधित कामांवर कर आकारणी व्हावयास हवी. सध्या एखाद्या कंपनीत काम करणाऱ्या एखाद्या कर्मचाऱ्याच्या उत्पन्नावर प्राप्तिकरासहित इतर विविध कर आकारले जातात. या कर्मचाऱ्याचे काम जर यंत्रमानव करत असेल; तर या यांत्रिक कामावरही कर आकारला जाणे अर्थातच आवश्‍यक आहे,'' असे गेट्‌स म्हणाले.

"किमान यांत्रिकीकरणाची गती कमी करण्यासाठी; वा इतर स्वरुपाच्या रोजगारांस आर्थिक पाठबळ पुरविण्यासाठी विविध कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या यंत्रमानवाच्या कामावर सरकारकडून करआकारणी केली जाणे आवश्‍यक आहे,' असे मत गेट्‌स यांनी व्यक्त केले.

गेट्‌स यांनी मांडलेली ही आर्थिक संकल्पना केवळ कागदावर अस्तित्वात नाही. युरोपिअन युनियनमधील सभासदांसमोर गेल्या 16 फेब्रुवारीस यांत्रिकीकरणावर कर आकारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र यासंदर्भातील चर्चेनंतर हा प्रस्तावफेटाळण्यात आला होता. या पार्श्‍वभूमीवर गेट्‌स यांच्याकडून मांडण्यात आलेली भूमिका महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.

Web Title: Robots should pay taxes: Bill Gates