होंडा ऍक्‍टिव्हाचा षटकार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 January 2020

क्रिकेटच्या 20-20 सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे षटकार अर्थात 6 याच संकल्पनेला समोर ठेवत होंडा मोटार कंपनीने मोटार विश्वात षटकार खेचला आहे.

नुकतेच आपण 2020 या वर्षात पदार्पण केले असून 2020 म्हटलंकी पहिली गोष्ट मनात येते ती म्हणजे 20-20 मॅच सध्या क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय प्रकार असणाऱ्या 20-20 चा विश्वचषक देखील या वर्षात पार प़डणार आहे. 20-20 सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे षटकार अर्थात 6 याच संकल्पनेला समोर ठेवत होंडा मोटार कंपनीने मोटार विश्वात षटकार खेचत नवीन होंडा ऍक्‍टिव्हा 6 जी चे अनावरण भारतीय बाजारात केले आहे. विशेष म्हणजे नव्या ऍक्‍टिव्हामध्ये बीएस-6 इंजिन बसविण्यात आले आहे. 

हा आहे सूर्यापेक्षाही प्राचीन पदार्थ

भारताची सर्वात आवडती स्कूटी असा मान असणाऱ्या ऍक्‍टिव्हाचे नवीन मॉडेल  "ऍक्‍टिव्हा 6-जी' चे आज मुंबईत अनावरण करण्यात आले असून स्टॅंडर्ड आणि डिलक्‍स अशा दोन प्रकारात ही स्कूटर दाखल करण्यात आली आहे. यातील स्टॅंडर्ड प्रकारातील स्कूटरची एक्‍स शोरूम किंमत 63 हजार 912 रुपये, तर डिलक्‍स प्रकारातील स्कूटरची एक्‍स शोरूम किंमत 65 हजार 412 रुपये आहे.

वाचा मुंबई आयआयटीचा हा अनोखा उपक्रम

सर्वात महत्त्वाचे म्हणजे नवीन ऍक्‍टिव्हा ही बीएस-6 इंजिनयुक्त असणार आहे. इंजिनसह गाडीच्या डिझाईनमध्येही बदल करण्यात आले असून यात फ्रंट एप्रोन, क्रोम इनसर्टस यासह एलईडी लॅम्प देण्यात आले आहे. तसेच गाडीच्या सिटसह चालकाच्या पुढील बाजूला असणारी जागादेखील वाढवण्यात आली आहे. तसेच यात सेमी-डिजिटल इन्स्ट्रूमेंट पॅनल आणि स्पीड एनलॉग काऊंटरसारखे आधुनिक तंत्रज्ञान देण्यात आले आहे. ज्यामुळे ट्रीप मीटर, ओडोमीटर, सर्विस रिमायंडरसारख्या सोयी उपलब्ध होणार आहेत. 
 

web title : Honda launched Activa 6G scooter with bs6 engine


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Honda launched Activa 6G scooter with bs6 engine