ग्राहकांअभावी बटाटा कचऱ्यात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 डिसेंबर 2016

नवी मुंबई : वाशीतील घाऊक बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात बटाट्याची आवक होत असून ग्राहकांअभावी त्यांचे दर कोसळले आहेत. आता तर घाऊक बाजारात तीन ते सहा रुपये किलोने त्यांची विक्री सुरू आहे. तरीही तो विकला जात नसल्याने बाजारात पडून तो खराब होत आहे.

खराब बटाटा व्यापाऱ्यांना कचऱ्यात फेकावा लागत आहे. 

वाशीतील घाऊक बाजारात इंदोर, गुजरात, उत्तर प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात बटाटा येत आहे. तो मुंबईला येईपर्यंत चार ते पाच दिवस जातात. इतके दिवस तो गोणीत भरून ट्रकमध्ये असतो. गाडीतील उकाड्यामुळे बटाटा नरम पडतो. इथे आल्यावर किमान दोन दिवसांत त्याची विक्री होणे अपेक्षित आहे; मात्र सध्या ग्राहकच नसल्याने बाजारात शुकशुकाट आहे. आवक असूनही मालाला उठाव नसल्याने बटाट्याचे दर खाली कोसळले आहेत. व्यापाऱ्यांना अगदी तीन रुपये दरानेही बटाटा विकावा लागत आहे. उत्तम दर्जाचा चांगला बटाटा आठ ते दहा रुपये किलोने विकला जात आहे. त्यालाही फार कमी ग्राहक आहे. त्यामुळे व्यापारी चिंतेत आहेत. 

बाजारात बटाट्याची आवक दिवसेंदिवस वाढतच आहे. ग्राहक मात्र कमी होत आहेत. एरवी बटाट्याचे दर बारा ते पंधरा आणि पंधरा ते अठरा रुपये किलो असतात; मात्र सध्या ते एकदम खाली आले आहेत. सध्या शेतकऱ्याचा बाजारात माल पाठवण्याचा खर्चही निघत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 
- मनोहर तोतलानी, व्यापारी. 
 
Web Title: No takers for Potato in Navi Mumbai