गारठ्यामुळे मासळीला आला भाव 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 डिसेंबर 2016

पुणे : वाढलेल्या गारठ्यामुळे मासळीच्या मागणीत वाढ झाली आहे. आवक चांगली असल्याने भाव टिकून आहेत. गणेश पेठेतील मासळीच्या घाऊक बाजाराजवळ रस्त्यांची कामे सुरू असल्याने सकाळच्या वेळेसच बाजार सुरू ठेवला जात आहे. 

पुणे : वाढलेल्या गारठ्यामुळे मासळीच्या मागणीत वाढ झाली आहे. आवक चांगली असल्याने भाव टिकून आहेत. गणेश पेठेतील मासळीच्या घाऊक बाजाराजवळ रस्त्यांची कामे सुरू असल्याने सकाळच्या वेळेसच बाजार सुरू ठेवला जात आहे. 

सध्या मासळीची मागणी वाढली असली तरी महापालिकेच्या विकासकामांमुळे एकच वेळ बाजार सुरू ठेवावा लागत असल्याने शिल्लक माल राहण्याचे प्रमाणही वाढले आहे. रविवारी (ता. 25) खोल समुद्र (10 टन), खाडी (200 ते 300 किलो) आणि नदीतील मासळीची (250 ते 300 किलो) आवक झाली. आंध्र प्रदेशातून नदीतील रहू, कतला, सीलन या मासळीची 10 टन आवक झाली. मटण आणि चिकन यांच्या मागणीतही ख्रिसमसच्या सणामुळे वाढ झाली. गावरान अंड्यांच्या शेकड्याच्या भावात थोडी तर इंग्लिश अंड्याच्या शेकड्याच्या भावात 45 रुपयांनी घट झाली आहे. त्यांच्या डझन आणि किरकोळ विक्रीच्या भावात बदल झाले नाहीत. 

भाव (प्रतिकिलो) 
पापलेट 
कापरी : 1600 
मोठे : 1400 
मध्यम : 1000 
लहान : 750 
भिला : 550 
हलवा : 440-480 
सुरमई : 360-480 
रावस लहान : 480 
मोठा : 550 
घोळ : 550 
करली : 280 
करंदी (सोललेली) : 240 
भिंग : 320 
पाला : 700-1400 
वाम : 650 
ओले बोंबील : 100-140 

कोळंबी 
लहान : 360 
मोठी : 480 
जंबोप्रॉन्स : 1400 
किंगप्रॉन्स : 800 
लॉबस्टर : 1450 
मोरी : 240 
मांदेली : 100 
राणीमासा : 160-200 
खेकडे : 200 
चिंबोऱ्या : 400 

खाडीची मासळी 
सौंदाळे : 240 
खापी : 200 
नगली : 400-480 
तांबोशी : 360 
पालू : 200 
लेपा : 160-240 
शेवटे : 200 
बांगडा : 120-160 
पेडवी : 80 
बेळुंजी : 100 
तिसऱ्या : 160 
खुबे : 160 
तारली : 140 

नदीची मासळी 
रहू : 140 
कतला : 160 
शिवडा : 180 
चिलापी : 80 
गूर : 130 
खवली : 180 
खेकडे : 160 
वाम : 400 

मटण 
बोकडाचे : 440 
बोल्हाईचे : 440 
खिमा : 440 
कलेजी : 480 

चिकन 
चिकन : 140 
लेगपीस : 170 
जिवंत कोंबडी : 110 
बोनलेस : 250 

अंडी 
गावरान 
शेकडा : 720 
डझन : 96 
प्रति नग : 8 
इंग्लिश शेकडा : 395 
डझन : 60 
प्रतिनग : 5

Web Title: Fish in great demand due to Winter in Pune