सेबीकडून आयडीबीआय बँकेची मुंबईतील मालमत्ता खरेदी 

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

सेबीने भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक मालमत्तेचे अधिग्रहण आहे. आयडीबीआय बँकेची बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील सात मजली कार्यालयाची इमारत सेबीने खरेदी करण्याचा करार केला आहे.

मुंबई: सेबीने भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक मालमत्तेचे अधिग्रहण आहे. आयडीबीआय बँकेची बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील सात मजली कार्यालयाची इमारत सेबीने खरेदी करण्याचा करार केला आहे. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबईतील मुख्य व्यवसायाचे केंद्र मानले जाते. सेबी आणि आयडीबीआय बँकेदरम्यान झालेल्या करारानुसार, सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) च्या संचालक मंडळाने अलीकडेच या खरेदीला मंजुरी दिली आहे.

ऍबॉट इंडियाने याआधी सप्टेंबर 2015 मध्ये बीकेसी येथे 4.35 लाख चौरस फूट जागा 1,480 कोटींना खरेदी केली होती. ऍबॉट इंडियानंतर सेबी-आयडीबीआयमधील हा दुसरा मोठा व्यवहार आहे. सेबीने 30,000 रुपये प्रति चौरस फूट या दराने आयडीबीआय बँकेच्या मालमत्तेची खरेदी केली आहे. आयडीबीआय बँकेची सध्याची इमारत बीकेसीच्या 'जी' ब्लॉक भागामध्ये स्थित असून येथेच सेबीचे सध्याचे कार्यालय आहे. हा ब्लॉक केवळ बँकिंग व वित्तीय सेवा देणाऱ्या कंपन्यांसाठी आरक्षित आहे आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) भारतातील सर्वात मोठय़ा बाजारपेठ देखील येथे आहे. 

Web Title: In ₹1,000-crore deal, SEBI buys IDBI Bank’s Mumbai property