25 हजाराचे 1 कोटी, या शेअरचा 40,000% रिटर्न... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shares

25 हजाराचे 1 कोटी, या शेअरचा 40,000% रिटर्न...

इकाब सिक्युरिटीज एंड इन्वेस्टमेंट लिमिटेडच्या (IKAB Securities & Investment)) शेअर्सने कमाल केली आहे. आता याचे शेअर्स 1,000 रुपांपर्यंत पोहोचले आहेत. हा असा शेअर आहे, ज्याने अगदी काही रुपयांत आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे.

इकाब सिक्युरिटीजचे शेअर्स गुरुवारी बीएसईवर 1,048.95 रुपयांवर ट्रेड कत होते. पण 23 एप्रिल 2004 ला पहिल्यांदा त्यांनी ट्रेडींग सुरु केले तेव्हा याची किंमत केवळ 2 रुपये 60 पैसे इतकी होती. मागच्या 18 वर्षांमध्ये या शेअरची किंमत 40,244.23 टक्क्यांचा रिटर्न मिळाला आहे.

1 लाख रुपयांचे 4 कोटी

एखाद्या गुंतवणूकदाराने 23 एप्रिल 2004 रोजी त्याच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक केली असती तर आज त्याचे 4 कोटी 3 लाख झाले असते. जर कोणी केवळ 25 हजार रुपये गुंतवले असते तर आज ती व्यक्ती कोट्यधीश झाली असती.

5 वर्षांमध्ये 6,000% रिटर्न

इकाब सिक्युरिटीजचे शेअर्समध्ये सध्या 4 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे आता या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची ही चांगली वेळ असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. फक्त या वर्षाचा विचार केल्यास यात 182 टक्के तेजी दिसून आली आहे, पण मागच्या 5 वर्षांचा विचार केल्यास यात 1,722.68 टक्के इतका मजबूत रिटर्न मिळाला आहे.

कंपनीचे मुख्यालय मुंबईत आहे. ही एक नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) आहे आणि आरबीआयकडे रजिस्टर्ड आहे. 358.36 करोड रुपये के मार्केट कॅप असलेली ही कंपनी फायनान्सशी संबंधित व्यवसायात आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

टॅग्स :Share MarketStock Market