मुंबई मेट्रोसाठी 10 कंपन्या इच्छुक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

'मेट्रो-2 ब' आणि "मेट्रो-4'साठी चांगला प्रतिसाद
मुंबई - मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) डी. एन. नगर ते मानखुर्द मेट्रो-2 ब आणि वडाळा ते कासारवडवली मेट्रो-4 मार्गाच्या कामासाठी नामांकित 10 कंपन्या सरसावल्या आहेत. एल. अँड टी., जे. कुमार आणि जीएचईसी-आरसीसी-जेव्ही या चिनी कंपनीसह इतरही काही कंपन्यांनी दोन्ही मेट्रो प्रकल्पांतील विविध टप्प्यांचे काम करण्याबाबत उत्सुकता दर्शविली आहे.

डी. एन. नगर ते मानखुर्द मेट्रो-2 ब आणि वडाळा ते कासारवडवली मेट्रो-4 मार्गाच्या कामासाठी "एमएमआरडीए'ने निविदा मागवल्या आहेत. त्याला कंपन्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मेट्रो-2 ब प्रकल्प चार टप्प्यांत करण्याची "एमएमआरडीए'ची योजना आहे. मेट्रो-4 प्रकल्पाचे काम पाच टप्प्यांत करण्यात येणार आहे. त्यासाठी कंपन्यांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. एल. अँड टी. कंपनीने मेट्रो-2 ब प्रकल्पातील एक टप्प्याचे काम करण्याची तयारी दर्शविली आहे. मेट्रो-4 प्रकल्पातील पाचही टप्प्यांचे काम करण्याची इच्छा त्या कंपनीने व्यक्त केली आहे.

चिनी कंपनीने मेट्रो-2 ब प्रकल्पातील एका टप्प्याचे काम करण्यासाठी प्रतिसाद दिला आहे. जे. कुमार कंपनीने मेट्रो-2 ब प्रकल्पातील दोन टप्पे आणि मेट्रो-4 प्रकल्पातील एक टप्पा करण्याची तयारी दर्शविली आहे. रिलायन्स आरडीई जेव्ही कंपनीची दोन्ही प्रकल्पांतील तीन टप्प्यांचे काम करण्याची तयारी आहे.

Web Title: 10 companies wanting for Mumbai Metro