प्रत्यक्ष कर संकलनात १०.६ टक्क्यांची वाढ

पीटीआय
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली  - प्रत्यक्ष कराच्या संकलनात चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सात महिन्यांत १०.६ टक्के वाढ झाली असून, व्यक्तिगत करदात्यांमध्ये झालेली वाढ याला कारणीभूत ठरली आहे. 

नवी दिल्ली  - प्रत्यक्ष कराच्या संकलनात चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सात महिन्यांत १०.६ टक्के वाढ झाली असून, व्यक्तिगत करदात्यांमध्ये झालेली वाढ याला कारणीभूत ठरली आहे. 

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते ऑक्‍टोबर या कालावधीत ३.७७ लाख कोटी रुपयांचा प्रत्यक्ष कर जमा झाला. मागील वर्षी याच काळात जमा झालेल्या करापेक्षा तो १०.६ टक्के अधिक आहे. ऑक्‍टोबरअखेरपर्यंत कराचे चालू आर्थिक वर्षातील उद्दिष्ट ४४.५ टक्के गाठण्यात यश आले आहे. प्रत्यक्ष करात कंपनी व व्यक्तिगत प्राप्तिकराचा समावेश आहे. प्रत्यक्ष कराचे संकलन चालू आर्थिक वर्षात १२.६४ टक्‍क्‍यांनी वाढून ८ लाख ४७ हजार ९७ कोटी रुपयांवर जाण्याचा अंदाज आहे. ते मागील आर्थिक वर्षात ७ लाख ५२ हजार २१ कोटी रुपये होते.

Web Title: 10.6 per cent increase in direct tax collection

टॅग्स