'एल अँड टी'च्या बोनससाठी 14 जुलै रेकॉर्ड डेट निश्‍चित

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 जुलै 2017

नवी दिल्ली : अभियांत्रिकी क्षेत्रातील कंपनी लार्सन अँड टुब्रोच्या (एल अँड टी) भागधारकांनी बोनस शेअर प्रस्तावास मंजुरी दिली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने दोन शेअर्समागे एक बोनस शेअर अर्थात 1:2 या प्रमाणात बोनस शेअर देण्याचा प्रस्ताव मांडला होता.

भागधारकांची पात्रता निर्धारित करण्यासाठी 14 जुलै ही रेकॉर्ड डेट निश्‍चित करण्यात आली आहे. मुंबई शेअर बाजारात एल अँड टीचा शेअर आज 0.69 टक्‍क्‍याने वधारून 1695.55 रुपयांवर बंद झाला. 

केंद्र सरकारने कंपनीतील 2.5 टक्के हिस्सेदारीची नुकतीच विक्री केली होती. यातून सरकारी तिजोरीत चार हजार कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. यामुळे सरकारचे वार्षिक वित्तीय तुटीचे लक्ष्य पूर्ण व्हायला मदत होणार आहे. चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारने विविध सरकारी कंपन्यांमधील हिस्सेदारी विक्रीतून 72 हजार कोटींचा निधी उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

Web Title: The 14 July record date for the L & T bonus is fixed