नवीन ह्युंदाई सॅंट्रोचे दिमाखदार लाँचिंग

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली: मध्यमवर्गीयांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या ह्युंदाई सॅंट्रो पुन्हा एकदा बाजारात दाखल झाली आहे. कंपनीचा ब्रँड अँबेसॅडर अभिनेता शाहरुख खान यांच्या हस्ते  नवीन मॉडेलचे लाँचिंग करण्यात आले आहे. डिलाईट, इरा, मॅग्ना, अस्ता आणि स्पोर्ट्स या पाच प्रकारात नवीन व्हर्जन दाखल झाले असून 3 लाख 89 हजारांपासून नाविनमोडेलची किंमत आहे. 1997 मध्ये आलेल्या सॅंट्रोचे उत्पादन २०१५ मध्ये बंद करण्यात आले होते. मात्र, कंपनीने पुन्हा एकदा या लोकप्रिय कारची मार्केट व्हॅल्यू कॅश करण्याचा प्रयत्न केला आहे. कंपनीच्या ईऑन या मॉडेलच्या जागी सँट्रो दाखल झाली आहे. 

हॅचबॅक प्रकारातील सॅंट्रो सात कलर्स मध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. नवीन कारमध्ये इंटिरिअर सहित बैठक व्यवस्था आरामदायी करण्यावर भर दिला आहे. रिव्हर्स कॅमेरा, स्टियरिंग ऑडियो कंट्रोल, रियर एसी व्हेन्ट्स आणि पार्किंग सेंसर्स सहित एंटी लॉक ब्रेक्स आणि स्टैंडर्ड ड्राइवर साइड एयरबॅग्स  देण्यात आली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, पेट्रोल मॉडेल 20.3 किमी प्रति लीटर तर सीएनजी मॉडेल 30.5 किमी प्रति लीटर ऍव्हरेज मिळेल. 

9 ऑक्टोबर रोजी बुकिंग ला सुरुवात झाल्यानंतर आतापर्यंत 23 हजार 500 गाड्यांचे बुकिंग कंपनीकडे नोंदविण्यात आली आहे. कंपनीने पहिल्या ५० हजार ग्राहकांना 11 हजार 100 रुपयांमध्ये बुकिंग उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

मॉडेलनुसार किंमत 

Santro Dlite(MT): Rs 3,89,900

Santro Era(MT): Rs 4,24,900

Santro Magna (MT): Rs 4,57,900

Santro Magna (AT): Rs 5,18,900

Santro Magna (CNG): 5,23,900

Santro Sportz(MT): Rs 4,99,900

Santro Sportz(AT): Rs 5,46,900

Santro Sportz(CNG): Rs 5,64,900

Santro Asta (MT): Rs 5,45,900

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा