दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 जानेवारी 2019

नवी दिल्ली - केंद्र सरकारने दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबविली असून, वितरणातील या नोटेचे प्रमाण हळूहळू कमी केले जाणार आहे, असे वृत्त एका संकेतस्थळाने उच्चपदस्थ सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. 

दोन हजार रुपयांच्या नोटेचा वापर कर चुकवेगिरी, काळा पैसा साठवणुकीसाठी होत असल्याचा संशय सरकारला आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारने या नोटांची छपाई बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

सरकारने नोव्हेंबर २०१६ मध्ये पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करत दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या होत्या. यासाठी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. सरकारने पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करून त्याऐवजी दोन हजार रुपयांची नोट चलनात आणून काळा पैसा साठविणाऱ्यांना मदत केल्याचा आरोप करण्यात आला होता. उच्च मूल्याच्या नोटा चलनातून रद्द करून त्याऐवजी आणखी मूल्याच्या नोटा चलनात आणून सरकारने काळ्या पैशाला आळा घालण्याच्या नोटाबंदीच्या मूळ हेतूला हरताळ फासल्याची टीकाही करण्यात आली होती. 

छपाई कमी करण्याचा निर्णय - अर्थमंत्रालय 
दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आली आहे. सरकारने या नोटांची छपाई मर्यादित करण्याचा निर्णय आधीच घेतला होता, यात नवे काही नाही. या नोटांची छपाई सुरू करतानाच नंतर त्यांचे प्रमाण कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असा खुलासा अर्थ मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी केला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2000 rupees currency printing close