कर्ज गैरव्यवहारात २४ वर्षांनंतर शिक्षा

पीटीआय
बुधवार, 28 मार्च 2018

नवी दिल्ली - कर्ज गैरव्यवहार प्रकरणात सुमारे २४ वर्षे खटला चालल्यानंतर अखेर पंजाब नॅशनल बॅंकेच्या (पीएनबी) माजी व्यवस्थापकाला पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा झाली आहे. 

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दिलेल्या माहितीनुसार, चरणजित अरोरा असे शिक्षा झालेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. कर्ज गैरव्यवहार झाला त्या वेळी १९९२ मध्ये तो ‘पीएनबी’मध्ये व्यवस्थापक होता. याप्रकरणी १९९२ मध्ये गुन्हा दाखल झाला आणि १९९४ मध्ये आरोपपत्र दाखल झाले. या खटल्यातून बॅंकेच्या दोन माजी कर्मचाऱ्यांची सुटका झाली असून, एका आरोपीचा सुनावणीदरम्यान मृत्यू झाला आहे. 

पंकज फायनान्स ॲण्ड लिजिंग लिमिटेडचे संचालक सुशील कुमार गुप्ता आणि अन्य आरोपींनी अरोरा याच्याशी संगनमत केले. आरोपींना न्यू बॅंक ऑफ इंडियाकडून (नंतर ‘पीएनबी’मध्ये विलीन) दोन कोटी रुपयांचे आणि करोलबाग येथील कॉर्पोरेशन बॅंकेकडून २५ लाख रुपयांचे कर्ज मिळविले. कॉर्पोरेशन बॅंकेने आधी कर्ज दिलेल्या वाहनांवर पुन्हा न्यू बॅंक ऑफ इंडियाकडून आरोपींनी कर्ज घेऊन फसवणूक केली.

गुन्हा दाखल - 1992
आरोपपत्र दाखल - 1994

Web Title: 24 years after Punishment in debt mismanagement CBI