सरकारी बॅंकांना २५,७७५ कोटींचा गंडा

पीटीआय
मंगळवार, 29 मे 2018

इंदोर - देशातील २१ सरकारी बॅंकांना मागील आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये विविध गैरव्यवहारांत २५ हजार ७७५ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. माहिती अधिकारांतर्गत रिझर्व्ह बॅंकेने ही माहिती उघड केली आहे. 

इंदोर - देशातील २१ सरकारी बॅंकांना मागील आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये विविध गैरव्यवहारांत २५ हजार ७७५ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. माहिती अधिकारांतर्गत रिझर्व्ह बॅंकेने ही माहिती उघड केली आहे. 

पंजाब नॅशनल बॅंकेला (पीएनबी) सर्वाधिक ६ हजार ४६१ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या आकडेवारीत १ लाख रुपयांपेक्षा अधिकच्या गैरव्यवहारांचा समावेश आहे. तसेच, वेगवेगळ्या गैरव्यवहारांचे स्वतंत्र तपशील देण्यात आलेले नाहीत. हिरे व्यापारी नीरव मोदी याने ‘पीएनबी’त केलेल्या १२ हजार ६३६ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा स्वतंत्र तपशीलही यामध्ये नाही. याचबरोबर गैरव्यवहारांची एकूण प्रकरणे आणि त्यांचे स्वरूप याबाबतही रिझर्व्ह बॅंकेने माहिती दिलेली नाही.

बॅंकांतील गैरव्यवहार (आकडे कोटी रुपयांमध्ये) 
पंजाब नॅशनल बॅंक6461
एसबीआय2390
बॅंक ऑफ इंडिया2224
बॅंक ऑफ बडोदा1928
अलाहाबाद बॅंक 1520

देशातील २१ सरकारी बॅंकांची स्थिती चिंताजनक आहे. गैरव्यवहारांमुळे बॅंकांना आर्थिक तोटा होण्यासोबत भविष्यात नव्याने कर्ज देण्याच्या त्यांच्या क्षमतेवरही प्रतिकूल परिणाम होत आहे. ही परिस्थिती अर्थव्यवस्थेसाठी चांगली नाही. 
- जयंतीलाल भंडारी, अर्थतज्ज्ञ

Web Title: 25775 crore rupees loss government bank