सुवर्णरोख्यांची विक्री 27 फेब्रुवारीपासून सुरू

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली: केंद्र सरकार सुवर्णरोख्यांच्या विक्रीचा सातवा टप्पा 27 फेब्रुवारीपासून सुरू करीत आहे. या रोख्यांची किंमत 2893 रुपये प्रति ग्रॅमएवढी निश्चित करण्यात आली आहे. नागरिकांना पाचशे ग्रॅमपर्यंतचे सुवर्णरोखे खरेदी करता येणार आहेत.

सुवर्णरोख्यांच्या विक्रीचा या आर्थिक वर्षातील हा शेवटचा टप्पा आहे. सुवर्णरोख्यांसाठी 27 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. पात्र अर्जदारांना सुवर्णरोख्यांचे वाटप 17 मार्चला करण्यात येणार आहे. सरकारने नागरिकांना प्रत्यक्ष सोने विकत घेण्याऐवजी सुवर्णरोख्यात गुंतवणूक करण्यासाठी ही योजना नोव्हेंबर 2015 पासून सुरू केली. यामुळे प्रत्यक्ष सोने खरेदी न करता त्यात गुंतवणुकीची संधी नागरिकांना मिळाली.

या सुवर्णरोख्यांची विक्री बॅंका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, ठराविक टपाल कार्यालये आणि शेअर बाजारांमध्ये होणार आहे. सरकारने या योजनेतून 3 हजार 60 कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत उभारला आहे. हे सुवर्णरोखे 8 वर्षे मुदतीचे आहेत. यातून पाचव्या वर्षात बाहेर पडण्याचाही पर्याय उपलब्ध आहे.

Web Title: 27 Feb gold sale