रिलायन्स जिओ तोट्यात; किती झाला तोटा?

वृत्तसंस्था
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

जिओ'ची 'दिवाळी धन धना धन' ऑफर
रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी 'दिवाळी धन धना धन' ऑफर सादर केली आहे. या ऑफरअंतर्गत चालू महिन्यात 12 ते 18 ऑक्टोबर दरम्यान 399 रुपयांचे रिचार्ज करणार्‍या प्री-पेड ग्राहकांना 100 टक्के 'कॅशबॅक' आणि आपला मागील ऑफर प्लॅन कायम ठेवता येणार आहे.

मुंबई: दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर 'फ्री'चा धडाका लावणार्‍या रिलायन्स जिओला गेल्या तिमाहीअखेर 270.59 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. मात्र या दरम्यान कंपनीच्या ग्राहकांची संख्या 13.68 कोटींवर पोचली आहे. जिओचे उत्पन्न मात्र 6 हजार 147 कोटी रुपयांवर पोचले आहे.

गेल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिलअखेर संपलेल्या तिमाहीत कंपनीला 22.5 कोटी रुपये तोटा होता. तो वाढून आता 270.59 कोटी रुपयांवर पोचला आहे. रिलायन्स जिओने बाजारात प्रवेश केल्यानंतर सहा महिन्यांच्या आत 10 कोटी मोबाइलग्राहकांचा टप्पा गाठला होता. सरलेल्या तिमाहीत तर कंपनीने 1.53 कोटी नवीन ग्राहक जोडले आहे.

जिओ'ची 'दिवाळी धन धना धन' ऑफर
रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी 'दिवाळी धन धना धन' ऑफर सादर केली आहे. या ऑफरअंतर्गत चालू महिन्यात 12 ते 18 ऑक्टोबर दरम्यान 399 रुपयांचे रिचार्ज करणार्‍या प्री-पेड ग्राहकांना 100 टक्के 'कॅशबॅक' आणि आपला मागील ऑफर प्लॅन कायम ठेवता येणार आहे.

ही ऑफर फक्त प्री-पेड ग्रहककणासाठी ग्राहकांसाठी असून आगाऊ रिचार्जसारखे (अॅडव्हान्स रिचार्ज) काम करेल. म्हणजेच ज्या ग्राहकांची वैधता संपणार असेल त्यांना देखील या ऑफरचा फायदा घेता येणार आहे.

खास दिवाळीचे दिवस बघता आणि प्रतिस्पर्धी कंपनी असलेल्या भारती एअरटेलने कमी किमतीच्या 4 जी स्मार्टफोनची ठराविक ऑफर्ससह घोषणा केल्यानंतर दुसर्‍याच दिवशी रिलायन्स जिओने कॅशबॅक ऑफर देऊ केली आहे. जिओच्या नवीन ऑफरमुळे पुन्हा एकदा दूरसंचार क्षेत्रात (टेलिकॉम सेक्टरमध्ये) अधिक स्पर्धा निर्माण होणे निश्चित आहे. शिवाय रिलायन्स जिओच्या दूरसंचार क्षेत्रातील प्रवेशामुळे 'दरयुद्ध' आणखी भडकण्याची शक्यता आहे.

'जिओ'च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'दिवाळी धन धना धन' ऑफरअंतर्गत 399 रुपयांचे रिचार्ज केल्यास तुमचा आधीचा प्लॅन कायन ठेवता येणार आहे. शिवाय 84 दिवसांसाठी 1 जीबी 4 जी डेटा मिळणार आहे. तसेच अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, एसएमएस आणि देशांतर्गत रोमिंगची सुविधा मिळणार आहे.

चालू महिन्यात 12 ते 18 ऑक्टोबर दरम्यान 399 रुपयांचे रिचार्ज केल्यानंतर 19 ऑक्टोबरपासून हा प्लॅन लागू होणार आहे. नाव जाहीर न करण्याची इच्छा व्यक्त करत जिओच्या अधिकार्‍याने पूर्ण कॅशबॅक ऑफरची माहिती दिली. त्यानुसार, 399 रुपयांचे रिचार्ज केल्यानंतर 100 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. म्हणजेच 400 रुपये परत मिळणार आहे. ग्राहकांना जिओ अॅपमध्ये 50 रुपयांचे 8 व्हाउचर मिळणार आहे.

मिळालेल्या व्हाउचर्सवर एक-एक व्हाउचर्सचा उपयोग करून जास्तीत जास्त 309 रुपयांचे रिचार्ज करता येणार आहे. शिवाय जे ग्राहक 'डेटा ऍड-ऑन'साठी या व्हाउचर्सचा उपयोग करणार आहे त्यांना 99 रुपयांहून अधिकचे रिचार्ज करावे लागणार आहे.

रिलायन्सच्या 'फ्री' 4जी फिचर फोनला टक्कर देण्यासाठी 28.1 कोटी यूज़र्स असलेली भारतातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने 4 जी स्मार्टफोन आणण्यासाठी हँडसेट बनवणार्‍या कार्बन मोबाईलशी करार केला आहे.

Web Title: 378 crore GB of data behind Reliance Jio's Rs 271 crore loss