'FD'वर अधिक व्याज मिळविण्याचे 'हे' आहेत 4 स्मार्ट मार्ग

टीम ईसकाळ
गुरुवार, 16 जानेवारी 2020

जेव्हा विषय तुमच्या बचतीचा असतो, त्यावेळी तुमची गुंतवणूक सुरक्षित आणि विश्वासार्ह हातात राहावी, आपल्या पैशात कायम भर पडत राहावी असा दृष्टिकोन सर्वोत्तम ठरतो. मात्र बचत खात्यावर मिळणारा व्याजदर खूप कमी असतो. तो महागाईशी मुकाबला करू शकत नाही. त्यामुळेच हातचे राखून साठवलेला पैसा कसा खर्च होईल यावर अंकुश राहत नाही. याकरिताच 'फिक्स्ड डिपॉझिट'मध्ये (एफडी)  गुंतवणूक करून तुम्ही तुमची बचत दिलेल्या गुंतवणूक आराखड्यात स्थिरपणे व विश्वासाने वाढवू शकता.

जेव्हा विषय तुमच्या बचतीचा असतो, त्यावेळी तुमची गुंतवणूक सुरक्षित आणि विश्वासार्ह हातात राहावी, आपल्या पैशात कायम भर पडत राहावी असा दृष्टिकोन सर्वोत्तम ठरतो. मात्र बचत खात्यावर मिळणारा व्याजदर खूप कमी असतो. तो महागाईशी मुकाबला करू शकत नाही. त्यामुळेच हातचे राखून साठवलेला पैसा कसा खर्च होईल यावर अंकुश राहत नाही. याकरिताच 'फिक्स्ड डिपॉझिट'मध्ये (एफडी)  गुंतवणूक करून तुम्ही तुमची बचत दिलेल्या गुंतवणूक आराखड्यात स्थिरपणे व विश्वासाने वाढवू शकता.

बजाज फायनान्स एफडीद्वारे तुमची बचत अनेक पटींनी वाढण्यावासाठी 4 स्मार्ट मार्ग:

ऑफरवरील अधिक एफडी दरांचा लाभ घ्या
एखादे आर्थिक गुंतवणुकीचे साधन कितपत नफा कमावू शकते हे त्याच्या व्याज दरावरून स्पष्ट होते. 'एफडी' गुंतवणूकदाराला परतावा देखील देतात. ग्राहक प्रकार कोणताही असू दे, तुम्ही अधिक 'एफडी' व्याजाची मजा चाखू शकता हे वास्तव आहे. त्यामुळे तुमची संपत्ती प्रभावीपणे वाढते व तुम्ही महागाईशी दोन हात करू शकता.

बजाज फायनान्समध्ये केलेल्या 'एफडी'वर ज्येष्ठ नागरिकांना 8.35 टक्के तर नियमित गुंतवणूकदाराला 8.10 टक्के व्याजदर मिळणार आहे. 36 महिन्यांच्या कालावधीवर हे व्याज देण्यात येते . हे सर्व व्याज गुंतवणुकीचा कालावधी पूर्ण झाल्यावर मिळते. या आकर्षक ऑफरमुळे तुम्हाला अल्पकालीन तसेच दीर्घकालावधीच्या 'एफडी'वर अधिक व्याज कमाविण्याची संधी आहे.

तक्त्याच्या आधारे 'एफडी'च्या माध्यमातून तुमची संपत्ती कशी वाढवू शकते हे बघा

Image

Image

*संगणकीय FD calculator चा वापर करून मोजलेले आकडे

दीर्घकालीन एफडीमध्ये गुंतवणूक करा
चक्रवाढ व्याजामुळे तुमची गुंतवणूक वाढते हे वास्तव लक्षात घ्यायला हवे.  तुम्ही जितका काळ तुमची रक्कम गुंतवून ठेवाल, तितका अधिक परतावा मिळेल.  किमान 3 वर्षांहून अधिक काळासाठी स्वत:ची एफडी ठेवली तर तुम्हाला मिळणारी एफडी रक्कम अधिक असेल. याकरिता 3 ते 4 किंवा साधारण 5 वर्षाकरिता रक्कम गुंतवावी. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर 5 वर्षासाठीच्या कालावधीकरिता 49.3 टक्क्यांच्या आसपास परतावा मिळायला मदत होईल. त्याशिवाय, किमान 25 हजार रुपयांच्या डिपॉझिट रकमेवर 'एफडी'चे लाभ मिळवता येतात. त्यासाठी मोठी रक्कम गुंतवण्याची आवश्यकता नाही. वास्तविक, Systematic Deposit Plan समवेत असलेले वैशिष्ट्य नव्याने गुंतवणूक करणा-यांना लाभदायक आहे, तुम्ही महिन्याला कमीत-कमी पाच हजार रुपये गुंतवू शकता आणि सावकाश तुमची बचत रक्कम वाढती राहील.

अधिक व्याज परतावा कमविण्यासाठी 'ऑटो रिन्युअल'चा पर्याय
तुमची बचत वाढविण्यासाठी 'ऑटो रिन्युअल' हा एक स्मार्ट मार्ग आहे.  चक्रवाढ व्याजदराची कमाई करण्यासाठी बजाज फायनान्स 'एफडी'मध्ये गुंतवणूक करून 'ऑटो रिन्युअल' पर्यायाचा लाभ घेणे फायदेशीर ठरते. त्या पद्धतीने तुम्ही सुलभपणे परिपक्व कालावधीपर्यंत तुमची गुंतवणूक पुन्हा गुंतवता व तुम्हाला ऑफरवर एफडी रिन्यूअल बोनसमधून फायदाही मिळतो. सध्या तुम्हाला बेस रेटवर अतिरिक्त 0.10 टक्के मिळत असून त्यामुळे अधिक चांगला नफा कमावणे शक्य होणार आहे. त्यामुळे तुम्ही दीर्घ कालावधीसाठी पुनर्गुंतवणूक करणे रास्त ठरेल.

मल्टी-डिपॉझिट सुविधेसोबत आपली गुंतवणूक यशस्वीपणे वाढवा
तुमची बचत अनेक पटीने वाढविण्याचा आणखी एक प्रभावी मार्ग ! मल्टी-डिपॉझिट सुविधेचा वापर करून या गुंतवणूक पर्यायाद्वारे तरलतेची (लिक्विडीटी)ची मजा घेता येईल. एक धनादेश वापरून तुम्ही अनेक एफडीमध्ये गुंतवणूक करू शकता व तुमच्या लक्ष्याप्रमाणे विविध कालावधीत त्या परिपक्व झाल्यावर त्यांचा आनंद उपभोगता येईल. भरभक्कम खर्चाच्या वेळी लागणाऱ्या गरजेचा विचार करून तुमच्या बचत धोरणाला चालना देणारा हा स्मार्ट मार्ग म्हणावा लागेल. तुमची गुंतवणूक परिपक्व झाल्यावर या निधीचा प्रभावी विनियोग तुम्हाला करता येतो.

बजाज फायनान्सच्या एफडीवर मिळणारी अतिरिक्त वैशिष्ट्ये आणि व्याज दर तुम्ही पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की, तुम्ही स्वत: फारसे प्रयत्न न करता  तुमची गुंतवणूक वाढवू शकता. याशिवाय, अशा पद्धतीच्या एफडीला सर्वाधिक विश्वासार्हता आणि स्थिर रेटींग आहेत. बाजार कितीही अस्थिर असला तरीही खात्रीशीर परताव्याची हमी तुम्हाला मिळते. वास्तविक बजाज फायनान्स ही केवळ 'एस अँड पी ग्लोबल'द्वारे ‘बीबीबी’ रेटींग मिळवलेली 'एनबीएफसी' नाही तर या कंपनीच्या वतीने देण्यात येणाऱ्या एफडीला 'क्रिसील'चे ‘एफएएएए’ रेटींग आणि 'आयसीआरए'चे ‘एमएएएए’ रेटींग प्राप्त आहे.

आजच गुंतवणुकीची सुरुवात करण्यासाठी Bajaj Finance online FD ची नोंदणी करा आणि लवकरच आमचा अधिकृत प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधेल.

(डिस्केलमर: गुंतवणूकदारांनी असे पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या बँकांविषयी किंवा वित्तसंस्थेविषयी योग्य माहिती घेऊनच स्वतःच्या जबाबदारीवर निर्णय घेणे अपेक्षित आहे. शिवाय गुंतवणुकीचे निर्णय घेताना आपल्या तज्ज्ञ आर्थिक सल्लागाराची मदत घ्यावी. सकाळ माध्यम समूहाचा गुंतवणुकीच्या निर्णयाशी कोणताही संबंध नाही.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4 smart ways to grow your wealth with a Bajaj Finance FD