मिस्त्रींसाठी ठरणार परीक्षेचा आठवडा

वृत्तसंस्था
सोमवार, 19 डिसेंबर 2016

टाटा समूहातील चार कंपन्यांच्या सभेत हकालपट्टीचा ठराव

मुंबई: टाटा सूमहातील आणखी चार कंपन्यांच्या संचालक मंडळातून सायरस मिस्त्री यांची हकालपट्टी करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा या आठवड्यात बोलाविण्यात आल्या आहेत. इंडियन हॉटेल्स (आयएचसीएल), टाटा स्टील, टाटा मोर्टस आणि टाटा केमिकल्सच्या विशेष सर्वसाधारण सभा 20 ते 23 डिसेंबरदरम्यान होणार आहेत. टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून मिस्त्री यांची हकालपट्टी केल्यानंतर समूहातील कंपन्यांच्या संचालक मंडळातून त्यांना बाहेर काढण्याची जोरदार मोहीम सुरू आहे.

आयएचसीएलच्या संचालक मंडळातून मिस्त्री यांना हटविण्याचा ठराव मांडण्यात येणार असून, या कंपनीत टाटा सन्सचा 28.01 टक्के हिस्सा आहे. कंपनीचे प्रवर्तक आणि प्रवर्तक समूह अशा 38.65 टक्के हिस्सा असून, बिगर प्रवर्तक भागधारक असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (एलआयसी) 8.76 टक्के हिस्सा आहे. एलआयसीचा टीसीएसमध्येही हिस्सा असून, या कंपनीच्या विशेष सर्वसाधारण सभेत एलआयसीने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता. आयएचसीएलमध्ये मिस्त्री यांचे 1 लाख 28 हजार 625 समभाग आहेत.
टाटा स्टीलमध्ये टाटा सन्सचा 29.75 टक्के, तर प्रवर्तक व प्रवर्तक समूह असा एकूण 31.35 टक्के हिस्सा असून, एलआयसीचा 13.62 टक्के हिस्सा आहे. टाटा मोर्टसमध्ये टाटा सन्सचा 26.51 टक्के हिस्सा असून, प्रवर्तक व प्रवर्तक सूमह असा एकूण 33 टक्के, तर एलआयसीचा 5.11 टक्के हिस्सा आहे. मिस्त्री यांच्याकडे कंपनीचे 14 हजार 500 समभाग आहेत. टाटा केमिकल्समध्ये टाटा सन्सचा 19.35 टक्के हिस्सा असून, प्रवर्तक व प्रवर्तक समूह असा एकूण 30.80 टक्के हिस्सा, तर एलआयसीचा 3.33 टक्के हिस्सा आहे. मिस्त्री यांच्याकडे कंपनीचे 16 हजार समभाग आहेत.

वाडियांना हटविण्याचीही मोहीम
टाटा स्टील, टाटा मोटर्स आणि टाटा केमिकल्स या कंपन्यांच्या संचालक मंडळातून मिस्त्री यांच्यासमवेत स्वतंत्र संचालक नुस्ली वाडिया यांना हटविण्याचाही ठराव मांडण्यात येणार आहे. टाटा सन्सचे हंगामी अध्यक्ष रतन टाटा यांना विरोध करत सायरस मिस्त्री यांना पाठिंबा दिल्याने वाडिया यांना हटविण्याच्या मोहिमेलाही वेग आला आहे.

Web Title: 4 Tata firms to vote on Mistry’s removal as director this week