देशातील 44 विमानतळे ‘उडान’साठी अनुकूल

44 airports in the country 'udana friendly
44 airports in the country 'udana friendly

'फिक्की'च्या अहवालातील माहिती ; मेट्रो शहरे, पर्यटन केंद्रांचाही अभ्यास 

अमरावती (आंध्र प्रदेश): देशातील 44 विमानतळांचा "उडान' या प्रादेशिक हवाई संपर्क यंत्रणेसाठी (आरसीएस) अधिक प्रभावीपणे वापर करता येऊ शकतो, असे उद्योग क्षेत्रातील अग्रणी संघटना "फिक्की'ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. भौगोलिक परिसर, प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि व्यावसायिक परिमाणांचा विचार केला, तर देशातील 414 पैकी 44 विमानतळांचा प्रादेशिक हवाई संपर्क यंत्रणेच्या उभारणीसाठी वापर करता येईल. यामध्ये ज्या विमानतळांचा अजिबातच वापर केला जात नाही आणि ज्यांचा फार कमी वापर होतो, अशा दोन्ही गटांतील विमानतळांचा समावेश आहे.

मेट्रो शहरे, विविध राज्यांच्या राजधान्या, महत्त्वाच्या औद्योगिक, व्यावसायिक आणि पर्यटन केंद्रांवर असणाऱ्या 370 विमानतळांची यादी आम्ही तयार केली असल्याचे "फिक्की'
च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेवा कंपनी "केपीएमजी'च्या सहकार्याने हा अहवाल तयार करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील चार, महाराष्ट्र, राजस्थान, पश्‍चिम बंगाल, आसाम या राज्यांतील प्रत्येकी तीन, अरुणाचल प्रदेश, मेघालय, बिहार, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, गुजरात, छत्तीसगडमधील प्रत्येकी दोन, आंध्र प्रदेश, तेलंगण, तमिळनाडू, ओडिशा, जम्मू आणि काश्‍मीर, पुदुच्चेरी, लक्षद्वीप, दमण आणि दिवू, हरियाना, मध्य प्रदेश, झारखंड आणि उत्तराखंडमधील प्रत्येकी एका विमानतळाचा यासाठी वापर केला जाऊ शकतो.

सामान्यांचा प्रवास
"आरसीएस' यंत्रणेच्या उभारणीसाठी 22 राज्यांनी पुढाकार घेतला असून, 30 विमानतळांना या यंत्रणेमध्ये तातडीने सामावून घेणे शक्‍य असल्याचे केंद्रीय हवाई वाहतूक सचिव राजीव नयन चौबे यांनी सांगितले. राष्ट्रीय हवाई वाहतूक धोरण-2016 अन्वये आरसीएस / उडाण (उडे देश का आम नागरिक) ही योजना सुरू करण्यात आली. यामुळे हवाई प्रवास हा सामान्य नागरिकाच्या आवाक्‍यात येणार आहे.

"आरसीएस'समोरील आव्हाने
निधी आणि पायाभूत सुविधांची चणचण
समान आकारांची विमाने हवीत
अनेक विमानतळांवर मोठे रन वे नाहीत
वेगवान वाहतुकीसाठी छोटी विमाने हवीत
सध्या भारतीय हवाई क्षेत्रात वैमानिकांचा तुटवडा

लहान विमानांसाठी वेगळे वैमानिक आणि कर्मचारी लागतात. वैमानिक आणि अभियंते एका रात्रीत तयार करणे शक्‍य नसते. त्यांना आधी प्रशिक्षण देणे आवश्‍यक आहे.
अरुण मिश्रा, प्रादेशिक संचालक, आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना

विमानांचे अर्थकारण
सध्या भारतात दरवर्षी दोनशे ते तीनशे वैमानिक तयार होतात. चीनचा विचार केला तर तेथील नागरी विमान वाहतूक विद्यापीठामध्ये दोन हजार केवळ प्रशिक्षक आहेत. तेथे प्रशिक्षणासाठी 265 विमानांचा वापर केला जातो, असे आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. विमान वाहतुकीचे अर्थव्यवस्थेवरदेखील दूरगामी परिणाम होतात. देशात येणारे एक विमान प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या सहाशे नोकऱ्यांची निर्मिती करते, असे मिश्रा यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com