प्रत्येक गावात फोरजी-फाईव्हजी नेटवर्क | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

5G network

ग्रामीण भागात डिजिटल पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सरकार वेगाने प्रयत्न करीत आहे.

प्रत्येक गावात फोरजी-फाईव्हजी नेटवर्क

मुंबई - देशाच्या प्रत्येक गावात फोरजी-फाईव्हजी नेटवर्क मिळावे यासाठी राज्य सरकार तीस अब्ज डॉलर गुंतवणार आहे, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज येथे ग्लोबल फिनटेक वेस्ट च्या समारोप प्रसंगी सांगितले.

ग्रामीण भागात डिजिटल पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सरकार वेगाने प्रयत्न करीत आहे. गावागावात फोरजी-फाईव्हजी नेटवर्क उभारण्यासाठी सरकार तीस अब्ज डॉलर खर्च करणार आहे. सध्या सरकारने हे नेटवर्क दीड लाख गावांपर्यंत नेले आहे. गावागावातून उद्योजक निर्माण करणे, तरुणांच्या सकारात्मक ऊर्जेचा वापर करून घेणे तसेच गावांना देशाच्या विकास प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी तेथे हाय स्पीड कनेक्टिव्हिटी उभारणे, यावर सरकार भर देत आहे. आता दरमहा ८० हजार गावांना नवी कनेक्शन दिली जात आहेत, असेही ते म्हणाले.

डिजिटल इंडिया च्या निर्मितीसाठी दूरसंचार क्षेत्र हा पाया आहे आणि प्रगती साधण्यासाठी डिजिटल नियमक यंत्रणेची फेरचना करण्याचा पंतप्रधानांचा मानस आहे. ही यंत्रणा जागतिक दर्जाची असावी यावरही भर दिला जाईल. नवे टेलिकॉम विधेयक, डिजिटल पर्सनल डाटा संरक्षण विधेयक आणि आयटी अॅक्ट २००० यांच्या आधारे ही नियमक यंत्रणा उभारली जाईल. त्याआधारे उद्योग आणि सरकार या दोघांच्याही शंका दूर केल्या जातील, असेही ते म्हणाले.

Web Title: 4g 5g Network In Every Village

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..