Video : मंदीत निश्चित उत्पन्नाचा पर्याय शोधताय?

टीम ईसकाळ
Friday, 20 September 2019

आयुष्याच्या संध्याकाळी तुमच्या भांडवलाची काळजी घेणे आणि कमावलेल्या पैशाचा खात्रीशीर परतावा मिळणे हे तुमचे प्राथमिक गुंतवणूक उद्दिष्ट असले पाहिजे.

आयुष्याच्या संध्याकाळी तुमच्या भांडवलाची काळजी घेणे आणि कमावलेल्या पैशाचा खात्रीशीर परतावा मिळणे हे तुमचे प्राथमिक गुंतवणूक उद्दिष्ट असले पाहिजे. एक वेळ येते, जेव्हा तुमचा नियमित उत्पन्न मिळवण्याचा कालावधी संपतो. अशावेळी उद्भवणाऱ्या गरजांसाठी आपल्याकडे असलेल्या पैशांचे आणि संपत्तीचे संरक्षण करणे आवश्यक ठरते. प्रामुख्याने महागाईचा दर वेगाने वाढतो आहे याची जाणीव प्रत्येकाला असणे आवश्यक आहे. 

तुमच्या सोनेरी दिवसांत सुलभ आर्थिक खतपाणी मिळावे आणि खात्रीशीर परतावा कमावताना अल्प जोखीम असलेल्या, बजाज फायनान्सद्वारे देण्यात येणाऱ्या सिनिअर सिटीझन Fixed Deposit मध्ये गुंतवणूक करावी. लवचिक कालावधीकरिता आकर्षक व्याज दर आणि विविध पेआऊट पर्याय, बजाज फायनान्सद्वारे विविध लाभ देण्यात येतात, ज्यामुळे वरिष्ठ नागरिकांसाठी एक आदर्श गुंतवणूक ठरते.

Image may contain: 2 people, people smiling, people sitting and glasses

एक वरिष्ठ नागरिक म्हणून तुम्ही या गुंतवणुकीचा विचार का करावा, यामागे 5 कारणे आहेत.

 गुंतवणूक आणि परताव्याची उच्च सुरक्षा आणि स्थिरत्व
बजाज फायनान्सद्वारे देण्यात येणारी फिक्स्ड डिपॉझीटची ऑफर उच्च स्थिरत्व आणि क्रिसिलद्वारे 'एफएएए' क्रेडीट रेटींग आणि आयसीआरएद्वारे 'एमएएए' अनुक्रमे मिळवून देते. हे रेटींग सुरक्षा आणि विश्वासार्हतेची दिशादर्शक असल्याने तुम्ही तुमची मुद्दल आणि परतावा रक्कम सुरक्षित हातात असल्याची निश्चिंती बाळगू शकतात. तसेच कालावधी परिपक्व झाल्यानंतर वेळेवर रक्कम हातात येईल अशी अपेक्षा करू शकता.

वरिष्ठ नागरिकांसाठी 8.70 टक्क्यांपर्यंतचा सर्वाधिक व्याज दर आकर्षक फिक्स्ड डिपॉझीट व्याजासह खात्रीशीर परताव्याच्या हमीकरिता बजाज फायनान्स ओळखली जाते. याशिवाय, इश्यूअर वरिष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त 0.35 टक्के व्याज दर उपलब्ध करून देतो. तुम्ही निवडलेल्या कालावधीच्या आधारावर वरिष्ठ नागरिक म्हणून तुम्ही 8.70 टक्के व्याज दर कमवू शकता. वेगवेगळ्या कालावधीसाठी तुम्ही किती नफा कमवू शकता हे पुढील चौकट बघून लक्षात येईल. 

Image may contain: one or more people and text

तुमचा परतावा आणखी दुप्पट करण्यासाठी, एफडीकरिता अर्ज करताना 'ऑटो-रिन्युअल' सुविधा निवडावी. या पद्धतीने परिपक्वता झाल्यावर तुमची रक्कम पुन्हा गुंतवावी, ज्याद्वारे अतिरिक्त 0.10 टक्के मुख्य दरावर कमावता येतात. तुमच्या एफडीच्या सुरुवातीच्या कालावधीच्या आधारे 'ऑटो-रिन्यूइंग'द्वारे तुम्ही वर नमूद केल्याप्रमाणे कितपत कमावू शकता, त्याविषयी:

No photo description available.

एफडीचा क्रम लवचिक कालावधी आणि रोखप्रवाहाची मजा लुटा
तुमची गुंतवणूक जर संपूर्ण कालावधीसाठी कुलुपबंद झाली असली, तरी रोखप्रवाहाचे आवश्यक नियोजन गरजेचे आहे. जेणेकरून तुमचे खर्च योग्य वेळेवर चालण्यासाठी रक्कम मिळेल. तुम्हाला याविषयी मदत करण्यासाठी बजाज फायनान्स 12 ते 60 महिन्यांसाठीचा लवचिक कालावधी उपलब्ध करून देते. याचा अर्थ तुमचे फिक्स डिपॉझीट विविध कालावधीसाठी जमा करता येतात व वेगवेगळ्या टप्प्यावर आवश्यक रोखप्रवाहाची मजा घेता येते. तुमची उद्दिष्ट आणि खर्च यांची वेळेवर सांगड घालण्यासाठी FD calculator चा वापर करावा.

तुमच्या खर्चाला हातभार लावण्यासाठीचे विविध इंटरेस्ट पेआऊट पर्याय
निवृत्ती-पश्चात तुमच्या नियमित उत्पन्नावर मर्यादा येत असल्याने, बजाज फायनान्स तुम्हाला गरजेनुसार निरनिराळे पेआऊट पर्याय उपलब्ध करून देतो. इथे तुम्हाला परिपक्वतेच्या दरम्यान किंवा कालावधी दरम्यान नियमित अंतराने फिक्स डिपॉझीट इंटरेस्ट पर्याय निवडण्याची सोय आहे. जर तुम्ही उत्पन्न नियमित मिळवण्याचा पर्याय निवडला, तर तुम्हाला मासिक, त्रैमासिक, अर्ध-वार्षिक किंवा वार्षिक कालावधी निवडता येतील. उदाहरणार्थ, जर तुम्ही नियमित खर्चांसाठी मासिक पेआऊट देणाऱ्या एफडीमध्ये गुंतवणूक करू शकता. त्याशिवाय, परिपक्वतेदरम्यान मिळणारी एफडी मोठ्या स्वरुपाच्या खर्चासाठी, जसे की मुलांचा विवाह, घर कर्ज चुकते करणे आणि यासारख्या खर्चासाठी वापरू शकता.

सुलभतेसाठी गुंतवणुकीचे अनेक पर्याय
बजाज फायनान्सच्या सोबतीने तुम्ही एफडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे गुंतवणूक करू शकता. जसे की ऑनलाईन किंवा डेबिट कार्ड व मल्टी-डिपॉझीट सुविधेची मजा तुमच्या पसंतीनुसार घेऊ शकता. लांब रांगेत उभे राहण्याच्या कटकटीपासून मुक्ती मिळवायची असल्यास आणि लांबलचक अर्ज भरण्याची इच्छा नसल्यास, इश्यूअरच्या वेबसाईटवर fill an easy online application form उपलब्ध आहे. तो भरून तुम्ही एफडीची नोंदणी करू शकता. त्या व्यतिरिक्त तुम्हाला नजीकच्या बजाज फायनान्सच्या शाखेला भेट देता येईल. त्याकरिता डेबिट कार्डचा वापर करून तुम्ही एफडी उघडू शकता.

शेवटी, जर तुम्हाला विविध फिक्स डिपॉझीटमध्ये गुंतवणूक करायची झाल्यास, तुम्ही मल्टी-डिपॉझीट सुविधेचा पर्याय निवडू शकता. ज्याद्वारे तुम्ही एकच धनादेश वापरून 5 एफडीमध्ये गुंतवणूक करू शकता. यामुळे तुम्हाला अनेक धनादेश लिहिण्याचा त्रास होणार नाही आणि विविध गुंतवणुकीसंबंधीचे घटक जसे की रक्कम, कालावधी आणि पेआऊट पर्याय निवडू शकता. त्याशिवाय, जर एखादी आपतकालीन स्थिती उद्भवली, आणि तुमच्या सर्व एफडी रद्द करून पैसे उभारण्याची गरज नाही. तुम्ही एक एफडी वेळेआधी काढून घेऊ शकता आणि इतरांवर योजनेनुसार परतावा मिळवता येतो.

आता तुम्हाला समजेल की, बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझीट हा पर्याय तुमच्याकरिता आदर्श आणि सर्वोत्तम आहे, ताणमुक्त निवृत्ती जीवनासाठी आजच गुंतवणूक करा.

(डिस्केलमर: कोणत्याही गुंतवणूक साधनांमध्ये गुंतवणूक करण्याआधी संपूर्ण माहिती जाणून घ्या. शिवाय गुंतवणूक करण्याआधी आपल्या आर्थिक सल्ल्गाराचा सल्ला जरूर घ्या आणि मगच गुंतवणूक करा.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5 Reasons why Bajaj Finance FD works best for senior