‘५जी’ सेवेला चीनमध्ये प्रारंभ

5G
5G

बीजिंग - दक्षिण चीनमधील गुआंगझोऊ बैयून आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपासून ५जी सेवा सुरू करण्यात आली आहे. ५जी सेवा उपलब्ध करून देणारा हा देशातील पहिला विमानतळ ठरला आहे. 

गुआंगडाँग प्रांतात हा विमानतळ आहे. ‘५जी’ सेवेमुळे या विमानतळावर आता १.१४ गिगाबाइट प्रतिसेकंद या सर्वोच्च वेगाने इंटरनेट सेवा मिळू शकते. ‘४जी’ सेवेपेक्षा हा वेग ५० पटींनी अधिक आहे, याबाबतची माहिती झिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिली आहे. 

चायना युनिकॉमने यासाठीचे बेस स्टेशन तयार केले आहे. यासाठी ‘हुआवेई ५जी लॅंपसाइट’चा वापर करण्यात आला आहे. 

गुआंगझोऊ बैयून हा दक्षिण चीनमधील मोठा विमानतळ आहे. येथून ९०हून अधिक आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे केली जातात. विमानतळाव्यतरिक्त गुआंगझोऊमधील मोठ्या औद्योगिक वाटिकांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com