‘इंडिगो’ला ६५२ कोटींचा तोटा

पीटीआय
गुरुवार, 25 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली - इंधन दरवाढ, डॉलरच्या तुलनेत घसरलेला रुपया याबरोबर विमान वाहतूक क्षेत्रातील तीव्र स्पर्धेमुळे इंडिगोची पालक कंपनी ‘इंटरग्लोब एव्हिएशन’ला सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत ६५२ कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीला ५५१ कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनीने आपले तिमाही निकाल आज जाहीर केले. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न १८ टक्‍क्‍यांनी वाढून ६,५१४ कोटी रुपयांवर पोचले आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत ते ५,५०५ कोटी रुपये होते. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात इंधनदरवाढीच्या भडक्‍यामुळे कंपनीचा एकूण खर्च ५८.२ टक्‍क्‍यांनी वाढून ७,५०२ कोटी रुपयांवर गेला आहे. त्यामुळे २०१५ नंतर कंपनीला प्रथमच या तिमाहीत ६५२ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 652 Crore Loss to Indigo