‘इंडिगो’ची एका दिवसात तब्बल 900 उड्डाणे

वृत्तसंस्था
रविवार, 9 एप्रिल 2017

आता आमचा संघ एका दिवसात 1000 उड्डाण करण्याचा मैलाचा दगड पार करण्यास उत्सुक झाला आहे,' असे 'इंडिगो'चे अध्यक्ष आदित्य घोष यांनी सांगितले.

अर्थविषयक बातम्यांसाठी वाचा 'सकाळ मनी'

नवी दिल्ली : 'इंडिगो' एकाच दिवसात 900 उड्डाणे करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 7 एप्रिलरोजी 'इंडिगो'च्या विमानांनी एकाच दिवसात 900 उड्डाणे पूर्ण केली आहेत. भारतीय नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील इतिहासात एकाच कंपनीने एका दिवसात 900 उड्डाणे करण्याचा विक्रम आहे.

'आम्ही एका दिवसात 900 उड्डाणे पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. आता आमचा संघ एका दिवसात 1000 उड्डाण करण्याचा मैलाचा दगड पार करण्यास उत्सुक झाला आहे,' असे 'इंडिगो'चे अध्यक्ष आदित्य घोष यांनी सांगितले.

कंपनीने नुकतेच उन्हाळ्याचे वेळापत्रक जाहीर केले असून देशांतर्गत 35 तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सात नवीन मार्गांवर उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

शुक्रवारी मुंबई शेअर बाजारात इंटरग्लोब एव्हिएशनची पालक कंपनी असलेला इंडिगोचा शेअर 1035.80 रुपयांवर व्यवहार करत 10.90 रुपयांच्या घसरणीसह बंद झाला. दहा रुपये दर्शनी किंमत असलेल्या शेअरने वर्षभरात 790 रुपयांची नीचांकी तर 1095.40 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे रु.37,762.79 कोटींचे बाजारभांडवल आहे.

Web Title: 900 take offs in a day by idigo airlines