आधारची माहिती पूर्णपणे सुरक्षित: यूआयडीएआय

वृत्तसंस्था
सोमवार, 6 मार्च 2017

नवी दिल्ली: बायोमेट्रिक माहितीच्या गैरवापराबाबत काही बाबी समोर आल्यानंतर आधारची माहिती पूर्णपणे सुरक्षित आणि संरक्षित असल्याची माहिती भारतीय नागरिकांक प्राधिकरणतर्फे (यूआयडीएआय) देण्यात आली. गेल्या अडीच वर्षांमध्ये अंशदान आधारशी जोडल्याने सरकारची 49 हजार कोटींची बचत झाल्याचे या वेळी सांगण्यात आले.

"यूआयडीएआय'ने बायोमेट्रिक माहितीच्या गैरवापराचा इन्कार केला. आधारच्या माहितीची चोरी झाल्याची कोणतीही घटना झाली नसल्याचेही या वेळी सांगण्यात आले. "यूआयडीएआय'ने याबाबत सखोल चौकशी केली असून, अशाप्रकारची कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. इतर यासारख्या व्यवस्थांपेक्षा आधारची माहिती अधिक सुरक्षित आहे. आधारच्या माहितीद्वारे कोणत्याही प्रकारच्या गैरवापराची तपासणी करता येऊ शकते, असेही या वेळी सांगण्यात आले.

Web Title: aadhar card information secure : UIDAI