‘आपलं घर प्लस’ नोंदणी 13 मेपर्यंत चालू राहणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

पुणे - ‘मेपल ग्रुप’च्या ‘आपलं घर प्लस’ या डिजिटल घरांच्या महा योजनेला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र गृहखरेदीदारांच्या आग्रहामुळे या योजनेत घराची नोंदणी करण्याची मुदत १३ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे, असे ‘मेपल ग्रुप’ व ‘आपलं घर प्लस’चे संस्थापक संचालक सचिन अगरवाल यांनी मंगळवारी एका प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

‘आपलं घर’ने १९ एप्रिल ते १ मे या कालावधीसाठी ही योजना सादर केली होती. पुण्याच्या चारही दिशांना पीएमआरडीए मान्यता प्राप्त व रेरा नोंदणीकृत १८ गृहप्रकल्पात वन बीएचके ११.५० लाख ते ३२ लाख रुपयांपर्यंत तर टू बीएचके १६.५० लाख ते ४७.५० लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. टोकन रक्कम भरून www.mapleshelters.com  या वेबसाइटवर किंवा शिवाजीनगर परिसरातील कार्यालयात घराची नोंदणी करता येईल. नोंदणीची मुदत संपल्यानंतर ग्राहकांना ३० टक्‍क्‍यांपर्यंतच्या महा बचतीचा लाभ घेता येणार नाही.

Web Title: aapal ghar plux digital home scheme