एसी, वॉशिंग मशिन महागण्याची शक्‍यता 

एसी, वॉशिंग मशिन महागण्याची शक्‍यता 

नवी दिल्ली - देशात फ्रिज, एअर कंडिशनर (एसी), मायक्रोवेव्ह ओव्हन आणि वॉशिंग मशिन महाग होण्याची शक्‍यता आहे. आघाडीच्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स कंपन्यांकडून उत्पादनांच्या किमतीमध्ये वाढ केली जाणार आहे. मार्च महिन्यापासून नवीन किमती आकारल्या जातील. चीनमधून होणाऱ्या सुट्या भागांच्या पुरवठ्यात घट झाल्यामुळे भारतातील विविध वस्तूंच्या किमतीवर परिणाम होईल. 

कोरोना विषाणूच्या फैलावामुळे चीनमधील उद्योग विश्‍व ठप्प झाले असून अनेक वस्तूंच्या उत्पादनात विपरित परिणाम झाला आहे. जगभरातील मोठ्या ब्रॅंडना सुट्या भागांच्या तुटवड्याला सामोरे जावे लागते आहे. एलजी, व्होल्टाज, सॅमसंग, हेअर आणि पॅनासॉनिक या आघाडीच्या कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या किमतीमध्ये 3 ते 5 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एका इंग्रजी संकेतस्थळावर यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. किमतीतील या वाढीमुळे चांगल्या दर्जाच्या उत्पादनांच्या किमतीत 3,000 ते 4,000 रुपयांची वाढ होण्याची चिन्हे आहेत. 

मागणी कायम राहील 
गेल्या महिन्यात कंपन्यांनी दूरचित्रवाणी संचाच्या किमतींमध्ये 7 ते 10 टक्‍क्‍यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. दूरचित्रवाणी संचातील महत्त्वाचा घटक असलेल्या एलईडी पॅनेलच्या किमतीमध्ये 15 ते 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाल्यामुळे टीव्हीच्या किमतीत वाढ झाली आहे. मात्र यामुळे वस्तूंच्या मागणीत घट होण्याची शक्‍यता नसल्याचे उद्योगविश्वातील जाणकारांचे म्हणणे आहे. नोटाबंदीनंतर फ्रिज, एसी आणि वॉशिंग मशिनची सर्वाधिक मागणी 2019 मध्ये नोंदवण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com