अर्थसंकल्पाच्या तयारीला वेग

अर्थसंकल्पाच्या तयारीला वेग

नवी दिल्ली, ता. १३ : आगामी २०२०च्या अर्थसंकल्पासाठी अर्थमंत्रालयाकडून सूचना मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. देशात पहिल्यांदा अशा प्रकारे अर्थसंकल्पापूर्वीच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांच्या संदर्भात सूचनांद्वारे अर्थसंकल्प तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. 

मागील अर्थसंकल्पात मंदीच्या प्रभावाने सुस्तावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने मदतीची घोषणा केली होती. अर्थमंत्रालय विविध क्षेत्रांकडून आणि संबंधित लोकांकडून अर्थसंकल्पापूर्वी सूचना मागवत असतानाच अर्थमंत्रालयाच्या महसूल विभागाने वैयक्तिक आणि कॉर्पोरेट पातळीवरील प्राप्तिकरासंदर्भात तसेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करासंदर्भात बदल करण्यासाठी सूचना मागवण्यासाठी परिपत्रक काढले आहे.  या निर्णयामुळे २०१९-२० या आर्थिक वर्षात केंद्र सरकारच्या महसुलाला १.४५ लाख कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com