शिल्पा शेट्टीच्या पाठिंब्याने व्यवसाय 100 कोटींच्या घरात...

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 जानेवारी 2020

अभिनेत्री शिल्ला शेट्टीने एका दांपत्याला व्यवसायासाठी पाठिंबा दिला आणि व्यवसायाने 100 कोटींचा टप्पा पार केला. सुरुवातील केवळ ऑनलाइनच्या माध्यमातून प्रॉडक्ट विकण्यास सुरुवात केली. मात्र, सध्या भारतातील 300 शहरांमध्ये 10 लाखांहून अधिक ग्राहक आहेत.

नवी दिल्लीः अभिनेत्री शिल्ला शेट्टीने एका दांपत्याला व्यवसायासाठी पाठिंबा दिला आणि व्यवसायाने 100 कोटींचा टप्पा पार केला. सुरुवातील केवळ ऑनलाइनच्या माध्यमातून प्रॉडक्ट विकण्यास सुरुवात केली. मात्र, सध्या भारतातील 300 शहरांमध्ये 10 लाखांहून अधिक ग्राहक आहेत.

पहिले प्रेम... आयुर्विमा पॅालिसी

वरुण अलघ आणि गझल अलघ असे या दांपत्याचे नाव असून, ते दिल्लीत राहतात. 2015 मध्ये व्यवसायाला सुरवात केली होती. लहान मुलांना लावण्यात येणाऱ्या पावडर आणि तेलामध्ये घातक घटक असल्याच्यामुळे या दांपत्याला काळजी वाटत होती.  भारतामध्ये आजही वापरल्या जाणाऱ्या अनेक बेबी प्रोडक्टसवर परदेशामध्ये बंदी आहे. या समस्येवर उपाय काढण्यासाठी वरूण व गझलने 25 लाख रुपये गुंतवणूक करत व्यवसाय सुरू केला. लहान मुलांसाठी कोणतेही घातक आणि हानीकारक घटक नसणारे प्रॉडक्ट वापरता यावे म्हणून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. बालकांसाठी सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र मिळवणारा ‘ममाअर्थ’ हा ब्रॅण्ड बाजारात आणला. ‘ममाअर्थ’चे सर्व प्रोडक्ट हे रसायनमुक्त आणि नैसर्गिक आहेत.

Shilpa Shetty

वरुण आणि गझलने आधी भारतीय बाजारापेठांमध्ये उपलब्ध असणाऱ्या बेबी प्रॉडक्टचा अभ्यास केला. अनेक महिने अभ्यास केल्यानंतर त्यांनी रसायनमुक्त आणि नैसर्गिक पद्धतीने प्रॉडक्ट कसे निर्माण करु शकतो याबद्दल माहिती शोधून काढली. स्वत:च्या कंपनीची संशोधन प्रयोगशाळा सुरु केली. या प्रयोगशाळेमध्ये प्राथमिक स्तरावर तयार करण्यात आलेल्या प्रॉडक्टची चाचणी घेण्यात आली. अमेरिकेत ज्या पद्धतीने या बालकांशी संबंधित प्रॉडक्टचा दर्जा ठरवला जातो, त्या सर्व चाचण्या करुन या प्रॉडक्टची चाचणी घेतली. मेडसेफ या जागतिक दर्जाच्या मानांकन संस्थेच्या दर्जानुसार त्यांनी प्रॉडक्ट बनवले. ‘ममाअर्थ’ मार्फत बनवण्यात येणाऱ्या प्रोडक्टपैकी आठ हजार प्रोडक्ट हे रसायनमुक्त आहेत.

नवीन वर्षात व्हा डिजिटल गुंतवणूकदार!

व्यवसाय सुरू केल्यानंतर ब्रॅण्डचे प्रमोशन करण्यासाठी शिल्पा शेट्टीला विचारणा केली. शिल्पाने त्यांची कल्पना ऐकून गुंतवणूकदार होण्याची तयारी दर्शवली. यामुळे व्यवसायात दिवसेंदिवस प्रगती होत गेली. सुरुवातील केवळ ऑनलाइन माध्यमातून ‘ममाअर्थ’ने प्रॉडक्ट विकण्यास सुरुवात केली. मात्र, आता थेट दुकानांमधूनही विक्री सुरु केली आहे.

पॅन-आधार जोडा मार्चपर्यंत; सलग आठवी मुदतवाढ!

दरम्यान, कंपनीने नुकताच आर्थिक उलाढालीमध्ये 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. या कंपनीच्या माध्यमातून बेबी प्रॉडक्टबरोबरच प्रौढांसाठींचे रसायनमुक्त आणि नैसर्गिक प्रॉडक्ट बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress shilpa shetty as investor business 100 Cr in sales by 2020