अदानी समूहाची हवाई सेवा kक्षेत्रात भरारी

पीटीआय
Tuesday, 26 February 2019

नवी दिल्ली - सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) विमानतळ व्यवस्थापनाच्या दृष्टीने सोमवारी पार पडलेल्या निविदाप्रक्रियेत अदानी समूहाने बाजी मारली आहे. प्रथमच हवाई क्षेत्रात उतरणाऱ्या अदानी समूहाला अहमदाबाद, जयपूर, लखनौ, तिरुवनंतपुरम आणि मंगलोर या पाच विमानतळांचा विकास आणि व्यवस्थापनाचे पुढील ५० वर्षांचे कंत्राट मिळाले आहे. 

अत्यंत आक्रमक निविदा सादर करणारा अदानी समूह इतर नऊ कंपन्यांच्या तुलनेत सरस ठरला. एकूण दहा कंपन्यांनी ३२ निविदा प्रस्ताव सादर केले. गुवाहटी वगळता इतर पाच विमानतळांच्या निविदा जाहीर झाल्या. अदानी समूहाने अहमदाबाद, जयपूर, लखनौ, तिरुवनंतपुरम आणि मंगलोर या पाच विमानतळांसाठी प्रती प्रवासी शुल्क अनुक्रमे १७७ रुपये, १७४ रुपये, १७१ रुपये, १६८ रुपये आणि ११५ रुपयांची बोली लावली. हे शुल्क समूहाकडून विमानतळ प्राधिकरणाला अदा केले जाईल.

मुंबई विमानतळासाठी अदानी समूहाचे प्रयत्न
अदानी समूहाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळातील २३.५ टक्के हिस्सा खरेदीसाठी प्रयत्न केला होता, मात्र विद्यमान जीव्हीके कंपनीने हा प्रयत्न हाणून पाडला. जीव्हीकेकडे मुंबई विमानतळाचा ५१ टक्के हिस्सा आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Adani Group Air Service Field