कोणत्याही सुचनेशिवाय अदानी ग्रुपचा कब्ज्याचा प्रयत्न! NDTV चा गंभीर आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NDTV founder Prannoy Roy_Adani deal

कोणत्याही सुचनेशिवाय अदानी ग्रुपचा कब्ज्याचा प्रयत्न! NDTV चा गंभीर आरोप

नवी दिल्ली : अदानी ग्रुप नवी दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेडचे (NDTV) २९ टक्के शेअर्स विकत घेणार असल्याची अधिकृत घोषणा अदानी ग्रुपकडून निवेदनाद्वारे करण्यात आली होती. पण आता यामध्ये नवा ट्विस्ट आला आहे. आपल्याशी कोणतीही चर्चा न करता हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप NDTVचे संस्थापक-प्रवर्तक राधिका आणि प्रणय रॉय यांनी केला आहे. (Adani group to acquire 29.18 pc stake NDTV founders say it happened without consent)

रॉय दाम्पत्यानं म्हटलं की, त्यांना विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेडद्वारे (VCPL) नोटीस बजावण्यात आली आहे की त्यांनी (VCPL) RRPRH होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडचं ​​नियंत्रण मिळवले आहे. (RRPRH) या संस्थेकडे NDTV चा २९.१८ टक्के हिस्सा आहे. त्याचे सर्व इक्विटी शेअर्स VCPLकडे हस्तांतरित करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. VCPL ने 2009-10 मध्ये NDTV च्या संस्थापक राधिका आणि प्रणॉय रॉय यांच्यासोबत केलेल्या कर्ज कराराच्या आधारे त्याचे अधिकार वापरले आहेत.

हेही वाचा: 'मुस्लीम पर्सनल लॉ'नुसार अल्पवयीन मुलगी पालकांच्या संमतीशिवाय लग्न करू शकते - हायकोर्ट

NDTVचे संस्थापक आणि कंपनी हे स्पष्ट करू इच्छिते की, VCPL द्वारे अधिकारांचा हा वापर NDTV संस्थापकांच्या कोणत्याही माहिती, चर्चा किंवा संमतीशिवाय अंमलात आणला गेला आहे. संस्थापकांना NDTV प्रमाणेच अधिकारांच्या या वापराची जाणीव करून देण्यात आली आहे. कालच, NDTV ने स्टॉक एक्सचेंजला कळवलं होतं की, त्यांच्या संस्थापकांच्या शेअर होल्डिंगमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

पत्रकारितेशी कधीही तडजोड केली नाही - प्रणोय रॉय

NDTV नं कधीही आपल्या कामामध्ये पत्रकारितेशी तडजोड केली नाही. आम्ही आमच्या पत्रकारितेच्या पाठीशी अभिमानाने उभे आहोत, असंही NDTVच्या संस्थापकांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Web Title: Adani Group To Acquire 2918 Pc Stake Ndtv Founders Say It Happened Without Consent

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :mediaDesh newsadani group