Shares: 25 रुपयांच्या या शेअरने 3 वर्षात एका लाखाचे केले 67 लाख... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aditya vision raising Shares

Shares: 25 रुपयांच्या या शेअरने 3 वर्षात एका लाखाचे केले 67 लाख...

गेल्या काही वर्षांत केवळ हेवीवेट नाही पण अनेक स्मॉलकॅप कंपन्याही मल्टीबॅगर ठरल्यात, अशीच एक कंपनी आहे आदित्य व्हिजन लिमिटेड (Aditya Vision Ltd.). म्हणायला ती स्मॉलकॅप कंपनी आहे, पण परताव्याच्या बाबतीत तिने मोठ्या कंपन्यांना मात दिली आहे. गेल्या तीन वर्षात या कंपनीने गुंतवणूकदारांच्या एक लाखाचे रुपांतर 67 लाखात केले आहे. गेल्या एका महिन्यापासून हा शेअर 1,400 रुपयांवर राहिला आहे. शेअरने अलीकडेच बीएसईवर 1,528.70 रुपयाच्या सर्वकालीन उच्चांकाला (All time high) स्पर्श केला होता.

कंपनी काय करते ?

आदित्य व्हिजन ही स्मॉलकॅप कंपनी असून तिचे मार्केट कॅप 1,690 कोटी आहे, जे कंझ्युमर डिस्क्रेशनरी गुड्स आणि सर्व्हिसेज सेक्टरसंबंधित आहे. आदित्य व्हिजन ही बिहारमधील लीडिंग इलेक्ट्रॉनिक रिटेल चेन आहे. कंपनीच्या बिझनेस पोर्टफोलिओमध्ये मोबाईल फोन, लॅपटॉप, टॅब्लेट, टीव्ही, साउंड बार, होम थिएटर, कॅमेरे आणि ऍक्सेसरीजसारख्या एंटरटेनमेंट सॉल्यूशंस, एसी, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशिनसारख्या घरगुती उपकरणांचा समावेश आहे.

15 ते 1,400 रुपयांपर्यंत प्रवास

12 डिसेंबर 2016 मध्ये हा शेअर 15.50 रुपयांवर होता. आतापर्यंत स्टॉकने 8,980 टक्के परतावा दिला आहे. अशा प्रकारे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने सहा वर्षांपूर्वी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याचे 90.83 लाख रुपये झाले असते.

हेही वाचा: Share Market : हे 3 शेअर्स तुमचा पोर्टफोलिओ बनवतील दमदार

1 लाख 57 लाख केले

18 सप्टेंबर 2020 रोजी स्टॉक 24.70 रुपयांवर होता. अशा प्रकारे दोन वर्षांत या शेअरने सुमारे 5,600 टक्के परतावा दिला आहे. जर कोणी दोन वर्षांपूर्वी आदित्य व्हिजनच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असेल तर त्याची रक्कम 57 लाख रुपये झाली असती. गेल्या एका वर्षात स्टॉकने 64 टक्के, 2022 मध्ये 124 टक्के परतावा दिला आहे.

मजबूत जून तिमाही निकाल

जून 2022 ला संपलेल्या तिमाहीत, कंपनीने 438.51 कोटी रुपयांच्या एकूण विक्रीसह 126 टक्के वाढ नोंदवली, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत 193.57 कोटी रुपये होती. कंपनीचा PAT (निव्वळ नफा) वर्षभरात 171 टक्क्यांनी वाढून 26.73 कोटी झाला आहे, जो मागील वर्षी याच तिमाहीत 9.83 कोटी होता.

हेही वाचा: Share Market: शेअर बाजारात तेजीला ब्रेक; सेन्सेक्स 337 तर निफ्टी 89 अंकांनी घसरला

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Web Title: Aditya Vision Has Turned 25 Rupees Into Direct 67 Lakhs In Three Years

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..