सुट्यांचा हंगाम संपल्याने विमानप्रवास पुन्हा स्वस्त

वृत्तसंस्था
सोमवार, 12 जून 2017

विमान कंपन्या प्रवाशांना देणार भरघोस सवलती

नवी दिल्ली: आगामी काळात प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विविध विमान कंपन्यांनी प्रवासभाड्यावर विशेष सवलती जाहीर केल्या आहेत. जूनअखेर सुट्यांचा हंगाम संपत असून त्यानंतर प्रवाशांची लगबग कमी होईल. यामुळेच आपला ग्राहकवर्ग टिकवून ठेवण्यासाठी विमान वाहतूक कंपन्यांकडून सवलती जाहीर केल्या जात आहेत.

इंडिगोची मॉन्सून स्पेशल ऑफर 12 ते 14 जूनदरम्यान खुली आहे. याअंतर्गत प्रवाशांना मुंबई-गोवा, जम्मू-अमृतसर, दिल्ली-उदयपूर, अहमदाबाद-मुंबई, चेन्नई- पोर्ट ब्लेअर, हैदराबाद- मुंबई, कोलकाता-आगरताला, दिल्ली- कोईंबतूर आणि गोवा-चेन्नई या मार्गांवर 899 रुपयांमध्ये तिकीटे उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. याविषयी बोलताना कंपनीचे मुख्य वाणिज्य अधिकारी म्हणाले की, "आणखी तीन दिवसांच्या 'मॉन्सून स्पेशल ऑफर'ची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. उन्हाळ्याची सुटी संपल्यानंतरदेखील मागणी कायम राहणे अपेक्षित असून आम्ही या सवलती सादर करीत आहेत."

विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी गोएअरनेदेखील विविध सवलती सादर केल्या आहेत. त्याचप्रमाणे, जेट एअरवेजने गेल्या आठवड्यात 27 जून ते 20 सप्टेंबरदरम्यान 1,111 रुपयांमध्ये तिकीटे उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली होती.

या आठवड्यात दिल्ली-मुंबई प्रवासासाठी साधारणपणे 7,000 रुपये मोजावे लागतील. मात्र, जुलैमध्ये हा प्रवास अवघ्या 2,100 रुपयांमध्ये होऊ शकतो. सहसा आधी बुकिंग करुन ठेवल्यास कमी दरात विमानाचे तिकीट उपलब्ध होते. ऐनवेळी बुकिंग करताना जास्तीचे पैसे भरावे लागतात. जुलै-ऑगस्टदरम्यान सुट्यांचा काळ संपलेला असतो त्यामुळे विमानप्रवासाची मागणीदेखील कमी होते.

Web Title: After the end of the holiday season, the plane is cheap again