आता सनी लिओनी 'ईडी'च्या जाळ्यात? 

वृत्तसंस्था
बुधवार, 6 जून 2018

मुंबई: बिटकॉईन गैरव्यवहारात आता अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रानंतर आता आणखी सेलिब्रिटींची नवे पुढे आली आहेत. त्यामध्ये आता  
अभिनेत्री सनी लिओनी, नेहा धुपिया, झरीन खान, सोनल चौहान, हुमा कुरेशी यांच्यासह अनेकांनी बिटकॉईनची प्रसिद्धी केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र कोणतेही अधिकृत वृत्त समोर आलेले नाही. 

अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) नुकतेच राज कुंद्रा यांना दोन हजार कोटींचा बिटकॉईन गैरव्यवहार केल्याने समन्स बजावले आहे. समन्स जारी केल्यानंतर  राज कुंद्रा ईडीच्या कार्यालयात हजर होते. ईडीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांकडून राज कुंद्रांची दोन तास कसून चौकशी करण्यात आली. आता यानंतर  सनी लिओनी, नेहा धुपिया, झरीन खान, सोनल चौहान, हुमा कुरेशी यांची देखील नावे पुढे आली आहेत. 

सध्या जागतिक बाजारात एका बिटकॉइनचे मूल्य 7,624 अमेरिकी डॉलर्सवर पोचले आहे. म्हणजेच भारतीय रुपयात सध्या एका बिटकॉइनचे मूल्य सुमारे ५ लाख १० हजार रुपये आहेत. आजपासून आठ वर्षांपूर्वी एका बिटकॉइनचे मूल्य फक्त 8 रुपये म्हणजेच 0.003 डॉलर इतके होते. सध्या जगभरातील बाजारात अनेक क्रिप्टोकरन्सी उपलब्ध आहेत. कॉईनमार्केटकॅप या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार सध्या जगभरात एक हजारांहून अधिक क्रिप्टोकरन्सी उपलब्ध आहेत. मात्र बिटकॉइन सर्वाधिक लोकप्रिय आणि महागडे आहे. 

Web Title: After Raj Kundra, ED may quiz Shilpa Shetty, Sunny Leone and others