कमजोर लिस्टिंगनंतर 5 पटीने वाढ, या शेअरने केली कमाल...

5 ऑक्टोबर 2020 रोजी एंजल वन शेअर्सची BSE आणि NSE वर कमजोर लिस्टींग झाली होती.
share market
share marketE Sakal

कोविडनंतर शेअर बाजाराला अनेक मल्टीबॅगर स्टॉक तर मिळालेच पण अनेक मल्टीबॅगर आयपीओही आले आहेत. एंजेल वन (Angel One) हा असाच एक आयपीओ आहे. या फिनटेक कंपनीचा आयपीओ सप्टेंबर 2020 मध्ये 305 ते 306 रुपये प्रति इक्विटी शेअरच्या प्राइस बँडवर लॉन्च करण्यात आला.

एंजेल वनच्या शेअरची किंमत आज सुमारे 1,460 रुपये आहे. म्हणजेच लिस्टींगनंतर दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत, या स्टॉकची किंमत दुप्पट झाली.(After weak listing Angel one IPO grows by 5 times)

5 ऑक्टोबर 2020 रोजी एंजल वन शेअर्सची BSE आणि NSE वर कमजोर लिस्टींग झाली होती. फिनटेक कंपनीचा शेअर 306 रुपयांच्या प्राइस बँडच्या तुलनेत जवळपास 10 टक्क्यांनी कमी होऊन 275 वर उघडला. तेव्हापासून या शेअरने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे.

एका महिन्यात 10% वाढ

गेल्या एका महिन्यात, शेअर 1,335 रुपयांवरून 1,460 च्या पातळीवर जवळपास 10 टक्क्यांनी वाढला आहे. 2022 मध्ये, एंजेल वनच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना 20 टक्के परतावा दिला आहे. लिस्टिंगनंतर, हा मल्टीबॅगर स्टॉक 257 रुपयांवरून 1,460 रुपयांपर्यंत वाढला आहे. दोन वर्षांपेक्षा कमी काळात या शेअरने 470 टक्के परतावा दिला आहे.

share market
'राष्ट्रपतीपदासाठी भाजपने शरद पवारांना उमेदवारी द्यावी'

दोन वर्षांत एक लाखाचे 5.70 लाख

2022 च्या सुरुवातीला या स्टॉकमध्ये एखाद्याने 1 लाख रुपये गुंतवले असते तर ते 1.20 लाख रुपये झाले असते. दुसरीकडे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने लिस्टिंगच्या दिवशी गुंतवणूक केली असती, तर त्याची रक्कम आज 5.70 लाख रुपये झाली असती.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com