हेमानी इंडस्ट्रीजचाही IPO येणार! सेबीकडे कागदपत्रे सादर

तुम्ही IPO मध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर येत्या काही दिवसात तुमच्यासाठी कमाईच्या संधी उपलब्ध असणार आहेत.
 IPO
IPOSakal
Summary

तुम्ही IPO मध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर येत्या काही दिवसात तुमच्यासाठी कमाईच्या संधी उपलब्ध असणार आहेत.

तुम्ही IPO मध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर येत्या काही दिवसात तुमच्यासाठी कमाईच्या संधी उपलब्ध असणार आहेत. बाजारात आता कृषी-केमिकल कंपनी हेमानी इंडस्ट्रीज लिमिटेडही (Hemani Industries Ltd.) IPO आणण्याच्या तयारीत आहे. पीटीआयच्या बातमीनुसार, कंपनीने आयपीओद्वारे 2,000 कोटी रुपये उभारण्यासाठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (SEBI) प्राथमिक कागदपत्रे सादर केली आहेत.

 IPO
सेबीकडून आणखी तीन IPO मंजूर

कंपनी नवे शेअर जारी करेल

IPO अंतर्गत कंपनी 500 कोटी रुपयांचे नवीन शेअर जारी करेल आणि त्याचे प्रमोटर्स 1,500 कोटी रुपयांपर्यंतच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) आणतील. जयेश मोहन दामा, मोहन सुंदरजी दामा आणि मीनल मोहन दामा विक्री ऑफरमध्ये 500 कोटी रुपयांपर्यंतचे शेअर्स ऑफर करतील. कंपनी 100 कोटी रुपयांच्या प्री-आयपीओ प्लेसमेंटचाही विचार करू शकते.

 IPO
LIC चा मेगा IPO या आर्थिक वर्षात येण्याची शक्यता कमीच; सूत्रांची माहिती

फंड कुठे वापरणार ?

हेमानी इंडस्ट्रीज लिमिटेड (Hemani Industries Limited) सायखा औद्योगिक वसाहतीमधील क्षमता विस्तारासाठी 129.71 कोटी खर्च करणार आहे. तसेच, कर्जाच्या पूर्ण किंवा आंशिक पेमेंटसाठी 48.34 कोटी रुपये वापरेल. याशिवाय, 93.87 कोटी रुपयांची रक्कम तिच्या संपूर्ण मालकीची उपकंपनी HCCPL मध्ये गुंतवणूक करण्यासाठी किंवा काही कर्ज फेडण्यासाठी वापरली जाईल. कंपनीच्या दीर्घकालीन खेळत्या भांडवलाच्या गरजांवर 150 कोटी रुपये खर्च केले जातील.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com