एअर एशिया इंडिया खरेदीची एअर इंडियाची तयारी

टाटा ग्रूपच्या एअर एशिया इंडिया चा ताबा घेण्याची तयारी एअर इंडियाने केली असून त्यासाठी त्यांनी काँपिटिशन कमिशन ऑफ इंडियाकडे अर्ज केला
air india wants 80 percent stake in air asia india tata group sends proposal
air india wants 80 percent stake in air asia india tata group sends proposalSakal

मुंबई : टाटा ग्रूपच्या एअर एशिया इंडिया चा ताबा घेण्याची तयारी एअर इंडियाने केली असून त्यासाठी त्यांनी काँपिटिशन कमिशन ऑफ इंडियाकडे अर्ज केला आहे. सध्या एअर एशिया इंडियामध्ये टाटा सन्सचे ८३.६७ टक्के भागभांडवल आहे. सुरुवातीपासूनच एअर एशिया इंडियाची सुरुवात अडखळत झाली आहे. त्यामुळे आता एअर इंडियाने त्या कंपनीचा ताबा घेतल्यावर त्यांची अवस्था सुधारेल असे बोलले जात आहे.

टाटा समूहाने एअर इंडियाचा ताबा घेण्यासाठी टॅलेस प्रा. लि. ही वेगळी कंपनी स्थापन केली आहे. आता एअर इंडिया टॅलेसकडून एअर एशिया इंडियाचे सर्व भागभांडवल खरेदी करेल. यासंदर्भातील कायदेशीर व्यवहार पूर्ण झाल्यावर एअर एशिया इंडिया व एअर इंडिया एक्सप्रेस यांच्यातर्फे एकत्रितपणे देशांतर्गत लो कॉस्ट विमानसेवा चालविली जाईल, असा अंदाज आहे. टाटांकडे मालकीहक्क गेल्यावर आता एअर इंडिया एक्सप्रेसला आपली २० टक्के विमाने देशांतर्गत मार्गांवर चालविण्याचे बंधन आहे. त्यामुळे अशाप्रकारे तो नियम पाळला जाईल, अशीही चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com