एअर इंडियाची ७६ टक्के हिस्सा विक्री करणार 

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 मार्च 2018

नवी दिल्ली - केंद्र सरकार एअर इंडियातील ७६ टक्के हिस्सा विकणार आहे. सरकारच्या वतीने एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीचा प्राथमिक आराखडा बुधवारी सादर करण्यात आला.  नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने एअर इंडिया आणि तिच्या दोन उपकंपन्यांतील हिस्सा विक्रीसाठी इच्छुक कंपन्याचे अर्ज मागविले आहेत. सरकार एअर इंडियातील ७६ टक्के हिस्सा विकणार असून, व्यवस्थापनाचेही हस्तांतर करणार आहे.

एअर इंडियाचे व्यवस्थापन अथवा कर्मचारी गट स्थापन करून यामध्ये हिस्सा विक्रीसाठी बोली लावू शकतात. या सर्व व्यवहाराची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अर्न्स्ट अँड यंग एलएलपी इंडियाची नियुक्ती करण्यात आली आहे.  आर्थिक कामकाजविषयक मंत्रिमंडळ समितीने जून २०१७ मध्ये एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीला परवानगी दिली होती. 

Web Title: Air India will sell 76 percent stake