एअरटेल पेमेंट बॅंकेचा दक्षिणेकडे रोख 

वृत्तसंस्था
सोमवार, 12 डिसेंबर 2016

नवी दिल्ली, (पीटीआय) : एअरटेल कंपनीने राजस्थानमध्ये पेमेंट बॅंकेची पथदर्शी सेवा सुरू केल्यानंतर पंधरवड्यात एक लाखाहून अधिक खातेदार जोडले आहेत. यामुळे कंपनीने पेमेंट बॅंकेचा विस्तार दक्षिणेतील राज्यांमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. 

एअरटेल पेमेंट्‌स बॅंक ही भारतात सर्वप्रथम सुरू झालेली पेमेंट बॅंक आहे. याविषयी बोलताना बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी अरोरा म्हणाले, ""आठवडाभरात दक्षिणेकडील आंध्र प्रदेश, तेलंगण आणि कर्नाटक राज्यात आम्ही सेवा सुरू करीत आहोत. या राज्यांमध्ये विस्तारासाठी खूप वाव आणि संधी आहेत. बॅंकिंग सुविधा नसलेला वर्ग येथे मोठ्या प्रमाणात आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगण राज्यात एकूण 20 हजार केंद्र आणि कर्नाटक राज्यात 15 हजार केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. यातून ग्राहकांना बॅंकिग सेवा देण्यात येणार आहे. यात ठेवी ठेवण्यासोबत पैसे काढण्याचीही सुविधा असेल. दूरसंचार क्षेत्रातील कंपनीच्या जाळ्यामुळे विस्तार करणे सोपे जात आहे.'' 

राजस्थानमध्ये पेमेंट बॅंकेचा पहिला पथदर्शी प्रकल्प सुरू केल्यानंतर पंधरवड्यात एअरटेल पेमेंट्‌स बॅंकेत एक लाखाहून अधिक बचत खाती उघडली गेली आहेत. यातील 70 टक्के खाती ग्रामीण भागातील आहेत. राजस्थानमध्ये बॅंकेची दहा हजार केंद्र आहेत. या केंद्रातून बॅंकिंग सुविधा देण्यात येत आहे. 

Web Title: airtel payment bank to go to south