कर भरला तरी बेहिशेबी मालमत्तांवर दंड 

पीटीआय
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - करभरणा करूनही बेहिशेबी मालमत्ता सापडल्यास दोनशे टक्के दंडाची रक्कम करण्याचा निर्णय केंद्रीय अर्थमंत्रालयाने घेतला आहे. 

पाचशे आणि एक हजारच्या नोटा बदलताना बेहिशेबी मालमत्तांची नोंद आढळून आल्यास अशा लोकांवर ही कारवाई करण्यात येणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाने सांगितले. कर भरला तरी बेहिशेबी मालमत्ता बाळगणाऱ्यांना सूट देणार नाही.याचसोबत शेतीवर आधारित उत्पन्नाला कोणताही कर लागणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी निश्‍चिंत रहावे. शेतमालाचे पैसे हे बॅंकांमध्ये भरता येणार, असेही अर्थमंत्रालयाकडून सांगण्यात आले.

Web Title: Although the full penalty disproportionate assets