ॲमेझॉनसह इतर कंपन्यांना ‘डीसीजीआय’च्या नोटिसा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली - आपल्या संकेतस्थळाद्वारे अधिकृत मान्यता नसलेल्या बनावट सौंदर्य प्रसाधनांची विक्री केल्याप्रकरणी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय)  ई-कॉमर्स क्षेत्रातील ॲमेझॉन व इतर कंपन्यांना नोटिसा काढल्या आहेत. अशा सौंदर्यप्रसाधनांची विक्री झाल्याचे आढळल्यास संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा ‘डीसीजीआय’ने दिला आहे. डीसीजीआयने यासंदर्भात ५ व ६ ऑक्‍टोबर रोजी देशभरात विविध ठिकाणी छापे टाकले होते.

यात वैध परवान्याशिवाय तयार केलेली स्वदेशी सौंदर्यप्रसाधने, तसेच आवश्‍यक नोंदणीशिवाय विदेशातून आयात केलेला कच्चा माल आढळला असून, अशा मिश्रित व बनावट सौंदर्यप्रसाधनांची ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्री होत असल्याचे समोर आले आहे. यानंतर ‘डीजीसीआय’ने या कंपन्यांना नोटीसा पाठवून १० दिवसांत खुलासा करण्यास सांगितले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amazon and other company notice by DCGI