
एक वर्षापूर्वी घटस्फोटावेळी पत्नीला तब्बल 25 लाख कोटी रुपयांची पोटगी दिली होती. त्यानंतर वर्षभरात इतकी संपत्ती कमावली की स्वत:चाच विक्रम मोडला आहे.
नवी दिल्ली - ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांनी त्यांच्याच संपत्तीचे रेकॉर्ड मोडले आहे. गेल्या वर्षी त्यांना घटस्फोटामुळे अॅमेझॉनमधील त्यांच्या एक चतुर्थांश संपत्तीचा भाग गमवावा लागला होता. सीएटल बेस्ड रिटेलर शेअर्समध्ये बुधवारी 4.4 टक्क्यांनी वाढ झाली. यामुळे 2878.70 डॉलर इतक्या विक्रमी उंचीवर पोहोचला. यामुळे जेफ बेजोसची संपत्ती वाढून ती 117.6 बिलियन डॉलरवर पोहोचली.
ब्लूमबर्ग बिलिनेअरच्या इंडेक्सनुसार बेजोस यांची याआधी सर्वाधिक संपत्ती 167.7 बिलियन डॉलर इतकी होती. 4 सप्टेंबर 2018 ला त्यांची संपत्ती इतकी झाली होती. बेजोस यांच्या संपत्तीमध्ये फक्त याच वर्षात 56.7 बिलियन डॉलरची वाढ झाली. सर्वात खडतर अशा काळात आर्थिक मंदीच्या दरम्यान अमेरिकेत संपत्तीमधील मोठी दरी यातून दिसते. आईपीओ आणि इक्वीटी बाजारामुळे बेजोस यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे.
हे वाचा - बापरे! येत्या दोन वर्षात सोन्याचे दर गाठणार इतकी उंची
बेजोस सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असले तरी एक वर्षापुर्वी त्यांचा घटस्फोट झाला होता. तो जगातील सर्वात महागडा घटस्फोट ठरला होती. त्यांनी पत्नी मॅकेन्झी हिला पोटगी म्हणून तब्बल 25 लाख कोटी रुपये दिले होते. यामुळे बेजोस यांच्या संपत्तीतही घट झाली होती. मात्र एक वर्षात त्यांच्या संपत्तीत पुन्हा वाढ होऊन त्यांनी स्वत:च्याच संपत्तीचा विक्रम मोडला आहे.
एका बाजुला लाखो लोक त्यांच्या नोकऱ्या गमवत आहेत. याच आठवड्यात अॅमेझॉनने सांगितले की. ते त्यांच्या फ्रंट लाइनला काम करणाऱ्यांना बोनस म्हणून 500 डॉलर देण्यासाठी जवळपास 500 मिलियन डॉलर खर्च करणार आहे. कंपनीचे संस्थापक जेफ बेजोस यांनी मात्र त्यांच्या संपत्तीबाबत काही बोलण्यास नकार दिला. कोरोना व्हायरसमुळे ई कॉमर्स क्षेत्रात प्रचंड वाढ झाली. साथीच्या या आजारामुळे ग्राहक ई कॉमर्सकडे मोठ्या प्रमाणावर वळले. याचा फायदा अमेझॉन डॉट कॉमला झाला.
हे वाचा - केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले,'काळजी करण्याची गरज नाही, लवकरच होणार एक कोटी...'
जगातील इतर श्रीमंत व्यक्तींमध्ये दुसऱ्या क्रमांकावर बिल गेट्स आहेत. त्यांची संपत्ती 114 बिलियन डॉलर आहे. त्यांच्या संपत्तीमध्ये 483 मिलियन डॉलरची वाढ झाली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या झुकेरबर्गच्या संपत्तीत 11.8 बिलियन डॉलरची वाढ झाली आहे. झुकेरबर्गची संपत्ती 90.2 बिलियन डॉलर इतकी आहे. त्याच्यानंतर बर्नार्ड अर्नाल्ट चौथ्या स्थानावर आहेत. त्यांच्या संपत्तीत 17.6 टक्क्यांची घट झाल्यानं एकूण संपत्ती 87.7 बिलियन डॉलर इतकी झाली.