अबब! 'अ‍ॅमेझॉन'चे भांडवल पोचले 5,58,67,26,00,00,000 रुपयांवर 

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 जानेवारी 2019

वॉशिंग्टन: अमेरिकी कंपनी 'अ‍ॅमेझॉन' ही जगातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. बाजारभांडवलाच्या बाबतीत अ‍ॅमेझॉनने आता बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्टला मागे टाकले आहे. 'अ‍ॅमेझॉन'चे बाजारभांडवल आता 796 अमेरिकी अब्ज डॉलरवर पोचले आहे. म्हणजेच भारतीय रुपयात ते 55 हजार 827 अब्ज कोटी रुपयांवर पोचले आहे. 

अ‍ॅमेझॉनच्या शेअरने उसळी घेतल्यानंतर कंपनीच्या एका समभागाची किंमत 1,629.51 डॉलरवर पोचली आहे. अमेरिकेच्या शेअर बाजारात अ‍ॅमेझॉनच्या शेअरने 3.44 टक्क्यांपर्यंत उसळी घेतली आहे. कंपनीच्या बाजारभांडवलात वाढ झाल्याने अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या संपत्तीत देखील मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून ती आता सुमारे 150 अब्ज डॉलरवर पोचली आहे. गेल्या 12 महिन्यात बोझेस यांच्या संपत्तीत तब्बल 60 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. आता बेझोस हे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकून पहिल्या क्रमांकावर पोचले आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amazon is now the world's most valuable private company