…म्हणून अनिल अंबानींनी नाकारले वेतन

 As Anil Ambani rejected the salary
As Anil Ambani rejected the salary

मुंबई: रिलायन्स जिओमुळे दूरसंचार क्षेत्रातील सर्वच कंपन्यांची अवस्था बिकट झाली आहे. रिलायन्स जिओची प्रतिस्पर्धी कंपनी असलेली रिलायन्स कम्युनिकेशनवर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. त्यामुळे कंपनीचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष अनिल अंबानी कंपनीवर चढलेला कर्जाचा बोजा लक्षात घेता चालू वर्षात पगार न घेण्याचे ठरवले आहे. चालू वर्षात अनिल अंबानी विनावेतन काम करणार असून कोणतेही कमिशन घेणार नसल्याचे कंपनीकडून जाहीर करण्यात आले आहे. रिलायन्स कम्युनिकेशनने सरलेल्या वर्षात 2 कोटी ग्राहक गमावले आहेत.

अनिल अंबानी यांनी घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देत कंपनीतील काही वरीष्ठ अधिकार्‍यांनीही 21 दिवसांचा पगार न घेण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्स कम्युनिकेशनला कर्जाच्या पुनर्रचनेसाठी डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. सध्या कंपनीवर 45 हजार कोटींचा कर्जाचा बोझा आहे.

रिलायन्स कम्युनिकेशनचे चालू वर्षात सप्टेंबरमध्ये एअरसेल व बुकफिल्डसोबत व्यवहार पूर्ण होणार आहे. त्यातून 20 हजार कोटी रूपयांची कर्जफेड करता येणार आहे. कंपनीवरील वाढत्या कर्जाच्या भारामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची घसरण झाली आहे. सध्या मुंबई शेअर बाजारात रिलायन्स कम्युनिकेशनचा शेअर 19 रुपयांवर व्यवहार करतो आहे.

पाच रुपये दर्शनी मूल्य असलेल्या रिलायन्स कम्युनिकेशनच्या शेअरने वर्षभरात  17.80 रुपयांची नीचांकी तर 55.40 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे रु.4,704.17 कोटींचे बाजारभांडवल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com