कर्ज कमी करण्यासाठी अनिल अंबानी मुंबईतील मुख्यालय विकणार?

कर्ज कमी करण्यासाठी अनिल अंबानी मुंबईतील मुख्यालय विकणार?

मुंबई: अनिल अंबानी सांताक्रुझ येथील उद्योग समूहाचे मुख्यालय विकण्याची किंवा भाड्याने देण्याची शक्यता आहे. सध्या अनिल अंबानींवर कर्जाचा डोंगर आहे. कर्ज कमी करण्यासाठी अनिल अंबानी आपले मुख्यालय विकू शकतात किंवा भाडेतत्वावर देऊ शकतात. यासंदर्भात अनिल अंबानींची ब्लॅकस्टोन आणि इतर काही आंतरराष्ट्रीय खासगी इक्विटी कंपन्यांशी बोलणी सुरू असल्याचे समोर येते आहे. दरम्यान अनिल अंबानींचे मुख्यालय कायदेशीर बाबींमध्ये अडकलेले आहे. अर्थात पश्चिम द्रुतगती महामार्गावरील 7 लाख चौ. फूटांची ही प्रॉपर्टी जर विकली गेली तर त्याची अंदाजे किंमत 1,500 ते 2,000 कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. 

अनिल अंबानी यांच्या समूहाने यासंदर्भात प्रॉपर्टी कन्सल्टन्ट कंपनी जे एल एलची नियुक्ती केली आहे. अंबानी दक्षिण मुंबईतील आपल्या बलार्ड इस्टेटमधील जुन्या कार्यालयात परतण्याचा विचार करत असल्याचीही माहिती आहे. अनिल आणि मुकेश अंबानी यांच्यात रिलायन्स समूहाची विभागणी झाल्यानंतर 2005 मध्ये अनिल अंबानींना हे कार्यालय मिळाले होते. अनिल अंबानींचा समूह सध्या आपल्या स्थावर मालमत्तांची विक्री करून भांडवल उभे करण्याच्या प्रयत्नात आहे. 2008 मध्ये जगातील सहावे श्रीमंत व्यक्ती असलेल्या अनिल अंबानींची मालमत्ता 42 अब्ज डॉलर होती. ती घसरून आता फक्त 3,651 कोटी रुपयांवर आली आहे. मार्च 2018 अखेर अनिल अंबानींच्या समूहावर 1 लाख 70 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com