‘वोक्हार्ट’ला युएसएफडीएचे पत्रक; शेअरमध्ये घसरण

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 मार्च 2017

नवी दिल्ली: अमेरिकी अन्न व औषध प्रशासनाने(युएसएफडीए) वोक्हार्टची उपकंपनी 'मोर्टन ग्रोव्ह फार्मास्युटिकल्स'ला नियमभंग प्रकरणी इशारा पत्रक जारी केले आहे. यानंतर इंट्राडे व्यवहारात वोक्हार्टचा शेअर सुमारे 5 टक्क्यांनी कोसळला आहे. मोर्टन ग्रोव्ह ही वोक्हार्टची 'स्टेप डाऊन' उपकंपनी आहे.

"अमेरिकी अन्न व औषध प्रशासनाने(युएसएफडीए) वोक्हार्टची "स्टेप-डाऊन' उपकंपनी 'मोर्टन ग्रोव्ह फार्मा'ला इशारा पत्रक जारी केले आहे. याचा अर्थ असा की, कंपनीचा सध्याचा पोर्टफोलिओ बाजारपेठेत उपलब्ध असेल परंतु नियमांची पुर्तता होईपर्यंत नव्या उत्पादनांची मंजुरी राखून ठेवली जाईल", असे कंपनीने शेअर बाजारात सांगितले आहे.

वोक्हार्टने युएसएफडीएच्या आक्षेपांवर उत्तर देण्यासाठी प्रक्रिया सुरु केली आहे. मागील महिनाभरात कंपनीचा शेअर 14 टक्क्यांनी वधारला आहे. दरम्यान, सेन्सेक्स 3 टक्क्यांनी वधारला आहे.

कंपनी गेल्या काही वर्षांपासून नियामक समस्यांचा सामना करीत आहे. कंपनीच्या भारतातील तीन प्रकल्पांमधून अमेरिकेत निर्यातीस बंदी आहे. महाराष्ट्रातील चिकलठाणा आणि वाळूज येथील प्रकल्पांना 2013 पासून 'इम्पोर्ट अलर्ट' जारी असून, गुजरातमधील अंकलेश्वर प्रकल्पालादेखील गेल्यावर्षी हा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई शेअर बाजारात वोक्हार्टचा शेअर आज(गुरुवार) 715 रुपयांवर उघडला. त्यानंतर, शेअरने 701 रुपयांवर दिवसभराची नीचांकी तर 729 रुपयांवर दिवसभराची उच्चांकी पातळी गाठली. सध्या(11 वाजून 52 मिनिटे) कंपनीचा शेअर 721.05 रुपयांवर व्यवहार करत असून 4.00 टक्क्यांनी घसरला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another USFDA warning for Wockhardt; US plant faces product approval freeze