गुगलला 11 हजार 594 कोटी रुपयांचा दंड

गुगलला 11 हजार 594 कोटी रुपयांचा दंड

ब्रसेल्स: युरोपियन युनियनने प्रतिस्पर्धा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी अमेरिकी कंपनी गुगलला 11 हजार 594 कोटी रुपयांचा  दंड ठोठावला आहे. ऑनलाइन सर्च जाहिरातीमध्ये स्पर्धक कंपन्यांच्या जाहिराती ब्लॉक करत असल्याची माहिती युरोपियन स्पर्धा आयोगाच्या आयुक्त मारग्रेथ व्हेस्टेगर यांनी पत्रकार परिषदेत  दिली. ऑनलाइन जाहिरातींमध्ये असलेल्या वर्चस्वाचा मूळ कंपनी अल्फाबेट आणि गुगलकडून गैरफायदा घेतला जात असल्याचेही व्हेस्टेगर यांनी सांगितले. 

गुगलने 2006 पासून 2016 पर्यंत अाॅनलाइन बाजारातील असलेल्या दबदब्याचा गैरफायदा घेत आहे. गुगलने थर्ड पार्टी स्पर्धक कंपन्यांच्या जाहिराती दाखविण्याच्या थांबवल्या होत्या. युरोपियन युनियनने सांगितले की, अनेक वेबसाइटवर गुगल सर्चचे फंक्शन उपलब्ध असते. कोणत्याही युजरने याचा वापर केल्यास सर्च रिझल्टसोबत सर्च जाहिरातीदेखील डिस्प्ले होतात. गुगल या सर्च जाहिरातींमध्ये स्पर्धक कंपन्यांच्या जाहिराती ब्लॉक करते. गुगलने 2006 मध्ये एडसेन्स काँट्रॅक्टमध्ये एक्सक्लुसिव्हिटी क्लॉज जाेडला हाेता. त्या अंतर्गत सर्च पेजवर मायक्रोसॉफ्ट आणि याहूसारख्या स्पर्धक कंपन्यांच्या जाहिराती थांबवण्यात आल्या होत्या. मायक्रोसॉफ्टने २००९ मध्ये याची तक्रार केली होती. त्यावर युनियनने 2016 पासून तपास सुरू केला होता.

युरोपियन युनियनकडून गुगलला दंड ठोठावला जाण्याची ही तिसरी वेळ असून गेल्यावर्षी अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमच्या चौकशीनंतर गुगलला 5 अब्ज डॉलरचा तर 2017 मध्ये 'ऑनलाइन शॉपिंग सर्च'शी संबंधित प्रकरणात गुगलला 2.42 अब्ज डॉलरचा दंड करण्यात आला होता. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com