‘आयडीबीआय’मधील हिस्सा खरेदीला मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

नवी दिल्ली- आयडीबीआय बॅंकेतील ५१ टक्के हिस्सा खरेदीला भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) संचालकांनी मंजुरी दिल्याची माहिती आर्थिक व्यवहार सचिव एस. सी. गर्ग यांनी काल दिली. बॅंकेकडून प्रेफरन्शीअल शेअर्स ‘एलआयसीला विक्री केले जाणार आहेत. 

‘एलआयसी‘च्या संचालक मंडळाची बैठक झाली. या वेळी केंद्र सरकारचे प्रतिनिधी आणि मंडळाचे संचालक म्हणून गर्ग उपस्थित होते. ‘आयडीबीआय‘ बॅंकेला भांडवलाची गरज आहे. ‘एलआयसी‘ला 
शेअर्सची विक्री करून बॅंक भांडवल उभारणी करेल, असे गर्ग यांनी सांगितले. सध्या ‘एलआयसी‘चा आयडीबीआय बॅंकेत ७ ते ७.५ टक्के हिस्सा आहे. ‘एलआयसी’कडून १० ते १३ हजार कोटींमध्ये हिस्सा खरेदी करण्यात येणार आहे. यामुळे एलआयसी आयडीबीआय बॅंकेतील सर्वात मोठी भागधारक होणार आहे. आयडीबीआय बॅंकेच्या संचालक मंडळावर चार संचालक ‘एलआयसी’ला नियुक्‍त करण्याचा मार्गही मोकळा होणार आहे. 

Web Title: Approval for purchase of IDBI stake