वित्तीय तूट पोचली  79.3 टक्‍क्‍यांवर 

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

नवी दिल्ली: चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सात महिन्यांत वित्तीय तूट 4.23 लाख कोटी रुपये म्हणजेच अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 79.3 टक्‍क्‍यांवर पोचली आहे. 

नवी दिल्ली: चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सात महिन्यांत वित्तीय तूट 4.23 लाख कोटी रुपये म्हणजेच अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 79.3 टक्‍क्‍यांवर पोचली आहे. 

गेल्या वर्षी एप्रिल ते ऑक्‍टोबर या सात महिन्यांत वित्तीय तूट अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 74 टक्के होती. आर्थिक वर्षातील खर्च आणि महसूल यातील अंतर म्हणून वित्तीय तूट गणली जाते. चालू आर्थिक वर्षात ती देशांतर्गत एकूण उत्पादनाच्या (जीडीपी) 3.5 टक्के म्हणजेच 5.33 लाख कोटी रुपये आहे. महालेखापालांनी (कॅग) दिलेल्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षात महसुलाचे उत्पन्न 10 लाख 54 हजार 101 कोटी रुपये आहे. यातील 5.30 लाख कोटी म्हणजेच 50.3 टक्के उद्दिष्ट गाठले आहे. सरकारने महसूल आणि बिगर कर्ज भांडवलातून पहिल्या सात महिन्यांत 7.27 लाख कोटी रुपये मिळविले आहेत. 

एप्रिल ते ऑक्‍टोबर या काळात नियोजनबद्ध खर्च 3.41 लाख कोटी रुपये असून, ते चालू आर्थिक वर्षातील उद्दिष्टाच्या 62 टक्के आहेत. याच काळातील बिगर नियोजन खर्च 8.09 लाख कोटी म्हणजेच उद्दिष्टाच्या 56.7 टक्के आहे. सरकारचा एकूण खर्च 11.50 लाख कोटी रुपयांवर पोचला असून, चालू अर्थिक वर्षात 19.78 लाख कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे. पहिल्या सात महिन्यांत महसुली तूट 3.27 लाख कोटी म्हणजेच उद्दिष्टाच्या 92.6 टक्‍क्‍यांवर पोचली आहे. 

 

 

Web Title: April-October fiscal deficit reaches 79.3% of full-year target