बॅंकांमध्ये 1 लाख कोटींचे गैरव्यवहार

पीटीआय
गुरुवार, 3 मे 2018

नवी दिल्ली - गेल्या पाच वर्षांत देशभरातील विविध बॅंकांमध्ये गैरव्यवहाराची सुमारे २३ हजार प्रकरणे उघडकीस आली असून, यामुळे बॅंकांना तब्बल १ लाख कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागल्याची माहिती रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) आज दिली.

नवी दिल्ली - गेल्या पाच वर्षांत देशभरातील विविध बॅंकांमध्ये गैरव्यवहाराची सुमारे २३ हजार प्रकरणे उघडकीस आली असून, यामुळे बॅंकांना तब्बल १ लाख कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागल्याची माहिती रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) आज दिली.

आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये बॅंकेतील गैरव्यवहाराचे ५,०७६ प्रकार उघडकीस आले होते. यात २०१७-१८ मध्ये वाढ होत अशा प्रकारची ५,१५२ प्रकरणे समोर आली. २०१७-१८ या वर्षात विविध बॅंकांमध्ये २८ हजार ४५९ कोटी रुपयांचे गैरव्यवहार झाले. हा आतापर्यंत सर्वांत मोठा आकडा असून, २०१६-१७ मध्ये ही रक्कम २३ हजार ९३३ कोटी रुपयांच्या घरात होती, अशी माहिती आरबीआयने माहिती अधिकाराअंतर्गत दाखल केलेल्या एक अर्जास उत्तर देताना दिली आहे. २०१३ ते १ मार्च २०१८ पर्यंत गैरव्यवहाराचे २३,८६६ प्रकार उघडकीस आले असून, यामुळे एकूण १ लाख ७१८ कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले. या गैरव्यवहारप्रकरणी तपास संस्थांकडून कारवाई सुरू आहे.

पाच वर्षांतील आकडेवारी
आर्थिक वर्ष - प्रकरणे - रक्कम (कोटी रुपयांत) 

२०१३-१४ - ४,३०६ - १०,१७०
२०१४-१५ - ४,६३९ - १९,४५५
२०१५-१६ - ४,६९४ - १८,६९८
२०१६-१७ - ५,०७६ - २३,९३३
२०१७-१८ - ५,१५२ - २८,४५९

‘एनपीए’त होतेय वाढ
बॅंकांच्या नॉन परफॉर्मिंग ॲसेटमध्ये (एनपीए) वाढ होत असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. डिसेंबर २०१७ पर्यंत बॅंकांची एकूण ८,४०,९५८ कोटी रुपये होती. यात स्टेट बॅंक ऑफ इंडियाचा एनपीए सर्वांधिक (२,०१,५६० कोटी) होता. त्याखालोखाल पीएनबी (५५,२०० कोटी), आयडीबीआय (४४,५४२ कोटी), बॅंक ऑफ इंडिया (४३,४७४ कोटी), बॅंक ऑफ बडोदा (४१,६४९ कोटी), युनियन बॅंक (३८,८४७ कोटी), कॅनरा बॅंक(३७,७९४ कोटी), आयसीआयसीआय बॅंकेचा एनपीए ३३,८४९ कोटी रुपये होता. 

Web Title: arthavishwa news 1 lakh crore rupees Non behavioral in bank